पाकिस्तान अफगाणिस्तानसोबत लढत आहे प्रॉक्सी वॉर, जिहादींना तालिबानच्या मदतीसाठी पाठवले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

इस्लामाबाद/काबूल । अफगाणिस्तानात (Afghanistan) तालिबानची क्रूरता सुरूच आहे. पाकिस्तानही तालिबानला खुलेपणाने पाठिंबा देत आहे. तालिबानला मदत करण्यासाठी पाकिस्तानने 20,000 जिहादी पाठवल्याच्या बातम्या येत आहेत. जिहादी पाठवून प्रॉक्सी वॉर लढणाऱ्या पाकिस्तानविरुद्ध अफगाण लोकांनी आवाज उठवला आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारतासह जगातील अनेक देशांमध्ये #SanctionPakistan हा हॅशटॅग सोमवारपासून ट्विटरवर ट्रेंड करत आहे. हा हॅश टॅग वापरून लोकं पाकिस्तानविरोधात बंदीची मागणी करत आहेत.

काबूलमध्ये पत्रकार हबीब खान यांनी #SanctionPakistan पाकिस्तान हॅशटॅग सुरू केला आहे. ही बातमी लिहेपर्यंत 3 लाख 24 हजार लोकांनी ट्विट केले होते. पत्रकार हबीब खान यांनी आपल्या फॉलोअर्सना #Sanction Pakistan हॅशटॅग दहा लाख वेळा ट्विट करण्याचे आवाहन केले आहे. अनेक युझर्सनी अफगाण लोकांच्या शांततेत राहण्याच्या अधिकाराचे समर्थन केले आहे. त्यांना असा अफगाणिस्तान हवा आहे जिथे अतिरेकी पाठवून त्यांच्या मुलांना ठार मारणाऱ्या शेजारच्या देशाच्या हस्तक्षेपाचा धोका नसेल.

युझर्स पाकिस्तानला करत आहेत ट्रोल
हॅशटॅगमुळे यूजर्स पाकिस्तानला ट्रोलही करत आहेत. एका युझरने ट्विट केले,”थोडक्यात अफगाणिस्तानात स्थिरता आणण्यासाठी आणि मानवता वाचवण्यासाठी पाकिस्तानवर निर्बंध लादण्याशिवाय पर्याय नाही.”

तालिबानी दहशतवादी लष्करच्या साहाय्याने करत आहे हल्ले
पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद यांनीही कबूल केले आहे की, अनेक तालिबानी दहशतवाद्यांची कुटुंबे पाकिस्तानमध्येच राहतात. अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद हनीफ आत्मर यांनी म्हटले आहे की,”तालिबानी दहशतवादी पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा आणि अल-कायदा यांच्या साहाय्याने हल्ले करत आहेत. ” त्याचवेळी, अलीकडेच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तालिबान्यांचे सामान्य नागरिक असे वर्णन केले होते.

तालिबानला मदत करण्यासाठी पाकिस्तानने सैनिक पाठवले – अफगाणिस्तान सरकार
अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमिरुल्लाह सालेह यांचे प्रवक्ते रिझवान मुराद म्हणतात, “आम्ही पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय समुदायाला सांगत आहोत की, तालिबान आणि त्याची पाठीराखी पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI ने मदरशांमधून 20,000 हून अधिक सैनिकांना अफगाणिस्तानात पोहोचवले आहे. तालिबानचे अल कायदा आणि इतर कट्टरपंथी गटांशीही संबंध आहेत. आमचे सैनिक किमान 13 दहशतवादी गटांविरुद्ध लढत आहेत.”

Leave a Comment