व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

पाकिस्तानने KPL साठी विराट कोहलीला दिली ‘ही’ ऑफर

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पाकिस्तानने पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा उकरून काढला आहे, यावेळी तर त्यांनी काश्मीर प्रकरणात थेट टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीचे नाव घेतले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने काश्मीर प्रीमियर लीगच्या (KPL) दुसऱ्या मोसमासाठी विराट कोहलीला खेळण्याचे आमंत्रण दिले आहे. केपीएलचे (KPL) अध्यक्ष आरिफ मलिक यांनी विराटला ही ऑफर दिली आहे.आपल्या भारतात जशी आयपीएल आहे तशी काश्मीरमध्ये काश्मीर प्रीमियर लीग (KPL) खेळवली जाते. या लीगचे आयोजन पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून करण्यात येते. मागच्या वर्षी पहिल्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या लीगच्या दुसऱ्या मोसमात खेळण्यासाठी भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला औपचारिक आमंत्रण दिले जाणार आहे असे आरिफ मलिक म्हणाले. ‘मोहम्मद रिझवानने एक चांगला संदेश दिला आहे, क्रिकेट या सगळ्यापासून लांब असलं पाहिजे, त्यामुळे आम्ही विराटला कमीत कमी एक मॅच खेळण्यासाठी तरी ये, असं आमंत्रण देत आहोत. आमच्याकडून आम्ही शांतीसाठीचा हात पुढे करत आहोत. याचा स्वीकार करायचा का नाही, हे आता त्याच्यावर अवलंबून आहे,’ असं आरिफ मलिक म्हणाले.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातले संबंध सध्या खूप खराब आहेत. दोन्ही देशांमध्ये मागच्या कित्येक वर्षांपासून द्विपक्षीय सीरिज खेळवली जात नाही आहे. इतर भारतीय खेळाडूंसोबत खेळण्यासाठीही आम्ही तयार आहोत. दोन्ही देशांमध्ये क्रिकेट खेळवलं गेलं तरच संबंध सुधारतील असे आरिफ मलिक म्हणाले आहेत. मागच्या वर्षी काश्मीर प्रीमियर लीगमध्ये (KPL) 6 टीम सहभागी झाल्या होत्या. रावलकोट हॉक्स संघाने पहिली काश्मीर प्रीमियर लीग जिंकली होती. आता केपीएलच्या दुसऱ्या मोसमात आणखी दोन नव्या टीम खेळणार आहेत. केपीएलच्या यंदाच्या मोसमाला 1 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. 14 ऑगस्ट रोजी या लीगची फायनल मॅच खेळवली जाणार आहे.

हे पण वाचा :

तुमचा नगरसेवक असलेल्या एखाद्या वॉर्डात फिरुन दाखवा; खासदार जलील यांचे फडणवीसांना आव्हान

कुठे फेडाल ही पाप, वर गेल्यावर तुम्हांला नरकातच जावं लागेल : अजित पवार

…तर मुंबईला 26 जुलैच्या परिस्थितीची आठवण येईल की काय?; नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

शेवटी भांड्याला भांडे हे लागणारच…; नाना पटोलेंच्या टीकेवर अजितदादांचे प्रत्युत्तर

अजित पवार पहाटेच्या शपथविधीवर कधी बोलणार?; नाना पटोलेंनी अजितदादांना डिवचलं