शत्रूला संदेश देण्यासाठी पाकने उडवली मिसाईल, स्वत:च्याच क्षेत्रात पडून अनेक घरं उध्वस्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | पाकिस्तानने दावा केला होता की, त्याने परमाणु हत्यार घेऊन जाण्याची क्षमता असणारे बॅलेस्टिक मिसाईल shaheen-III चे यशस्वी परीक्षण केले आहे. यानंतर राष्ट्रपतींच्या सोबत पंतप्रधान इम्रान खान यांनीही यावर स्तुतीसुमने उधळली होती. पण पाकिस्तानमधील एक नेते या परीक्षना विरोधात बोलले आहेत. हे मिसाईल बलुचिस्थानमध्ये पडले असून त्यामुळे पाच लोक मृत्यूमुखी पडले आहेत असे ते म्हणाले.

बलूच रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते शेर मोहम्मद बुगती यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून ट्विट केले आहे. ते या ट्विटमध्ये म्हणतात की, ‘पाकिस्तानी सैन्याने बलुचिस्तानला एका लॅबोरेटरी मध्ये बदलून टाकले आहे. डेरा गाझी खानमधून परीक्षणासाठी सोडलेले मिसाईल हे मट्ट, डेरा, बुगती या रहिवाशी भागामध्ये येऊन पडली. ज्यामुळे कित्येक लोकांचे घर उद्ध्वस्त झाले असून दोन महिला आणि दोन लहान बाळासहित पाच लोक गंभीर घायाळ झाले आहेत’.

यासोबतच ॲक्टिविस्ट फाजीला बलूच यांनीसुद्धा या घटनेविरोधी मत व्यक्त केले आहे. ट्विट करून त्या म्हणाल्या की, ‘ बलुचिस्तान हे नेहमीच पाकिस्तानी सैन्याच्या घातक हत्यारांचे प्रयोग करण्याचे केंद्र राहिले आहे. पुढे त्या म्हणाल्या की, पाकिस्तानी सैन्याने तिन शहीन मीसायलीचे परीक्षण केले. सर्व मिसायली ह्या डेरा बुगतीमध्ये येऊन पडल्या. खूप लोकांना गंभीर इजा सुद्धा झाल्या आहेत. यापूर्वी 1998 मध्ये पाकिस्तानने त्याच्या परमाणु मिसाईलचे परीक्षण बलुचच्या चिघीमध्ये केले होते. या परीक्षणामध्ये घायाळ झालेल्या लोकांचे छायाचित्रही फाजीला यांनी ट्विटरवरती शेअर केले होते.

बालोकिस्तान ही आपली मातृभूमी आहे, ती प्रयोगशाळा नाही. डेरा बुगटीतील नागरिकांवर पाकिस्तानी लष्कराच्या क्षेपणास्त्र चाचणीविरोधात बोलण्यासाठी आम्ही सर्व पीडित राष्ट्रांना आवाहन करतो असे ट्विट शेर बुग्ती यांनी केले होते.

Leave a Comment