विमान हवेत असताना पाकिस्तानी प्रवाशाचा धांगडधिंगा, लाथ मारून खिडकी फोडण्याचा केला प्रयत्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईनच्या विमानात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये विमानातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने विमानातील सीटवर आणि विमानाच्या खिडकीवर लाथा मारून विमानाची खिडकी फोडण्याचा प्रयत्न (passenger tries to break window) केला. यामुळे विमानातील इतर प्रवाशांना त्याच्या या कृत्यामुळे (passenger tries to break window) मनस्ताप सहन करावा लागला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
ही घटना 14 सप्टेंबर रोजी घडली आहे. यादिवशी संबंधित प्रवाशी पीआयएच्या पीके-283 फ्लाइटमधून पेशावर ते दुबई प्रवास करत होता. पेशावर येथून विमानाने उड्डाण केल्यानंतर, तो फ्लाइट क्रूकडे विमानातून उतरवण्यास सांगत होता. पण विमान हवेत असल्याने फ्लाइट क्रूने त्याची मागणी अमान्य केली. त्यामुळे संतापलेल्या प्रवाशाने विमानाच्या खिडकीला लाथ (passenger tries to break window) मारली आहे. हा सर्व प्रकार विमानातील एका व्यक्तीने आपल्या मोबाइलमध्ये रेकॉड केला.

या प्रकारानंतर खबरदारीचा उपाय म्हणून फ्लाइट क्रूने विमान वाहतूक कायद्यानुसार संबंधित प्रवाशाला सीटवर (passenger tries to break window) बांधले. यानंतर त्या प्रवाशाला विमान दुबईला उतरल्यानंतर विमानतळ पोलिसांच्या ताब्यात दिले. यानंतर विमानतळ पोलिसांनी त्याला पुन्हा पाकिस्तानात पाठवलं.

हे पण वाचा :
निवडणूकीचा बिगूल वाजला ः राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर
आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू!!!
IND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर