व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

पाकिस्तान भारतापेक्षा दुप्पट आनंदी देश? वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्समध्ये भारताची मोठी घसरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संयुक्त राष्ट्राने शुक्रवारी जागतिक आनंदी अहवाल सादर केला आहे. सर्वेक्षण केलेल्या एकूण १५६ देशांमध्येभारताचा क्रमांक १४४ स्थानी घसरला आहे.  लेसोथो आणि मालवी या देशांच्या मध्ये भारताने ३.५७३ मिळविले आहेत.  दुसरीकडे पाकिस्तान ने ५.६९३ गुणांनी ६६ वे स्थान मिळविले आहे. तुलनेत भारताचे स्थान खूपच खाली घसरले आहे. फिनलँड ने सलग तिसऱ्यांदा ७.८०९ गुणांनी प्रथम स्थान मिळविले आहे तर डेन्मार्क आणि स्वित्झर्लंडनी दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला आहे. त्यापाठोपाठ आइसलँड आणि नार्वेचा क्रमांक लागला आहे.

यावर्षीचे गुणांकन हे २०१८ आणि २०१९ चा डाटा वापरून केले आहे. हा इंडेक्स दरडोई जीडीपीचा विकास, निरोगी आयुर्मान, आयुष्यातील निवड स्वातंत्र्य, सामाजिक समर्थन, औदार्य, भ्रष्टाचाराबाबत जनजागृती या आधारावर हा आनंदी इंडेक्स मोजला जातो. भारताची २०१३ पासून सातत्याने या इंडेक्स मध्ये घसरण होते आहे. २०१३ साली भारत ११७ व्या क्रमांकावर  होता,२०१६ साली ११८, २०१७ साली १२२, २०१८ साली १३३, २०१९ साली १४० आणि २०२० साली १४४ अशा प्रमाणे भारत या इंडेक्स मध्ये घसरला आहे.

या अहवालातील एक लेखक जॉन हेलिवेल म्हणतात, “आंनदी देश तो असतो जिथे लोकांना एकमेकांशी जोडलेले जाणवतात, जिथे लोक एकमेकांवर विश्वास ठेवतात, आनंदी राहतात आणि हे सर्व त्यांना त्यांच्या सामाजिक संस्थांशी जोडलेले असते. आणखी एक लवचिकता असते. कारण ते सामायिक विश्वासाने अडचणींचे ओझे कमी करतात.” भारताची हि घसरण पाहता यावर विचार करण्याची गरज आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.