Saturday, March 25, 2023

शोएब अख्तर पुन्हा बरळला ; म्हणाला सैन्याच बजेट वाढविण्यासाठी गवत सुद्धा खाईन

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. एक वेळ गवत खाईन, पण लष्कराचे बजेट वाढवेन, असे वक्तव्य शोएबने केले आहे.

शोएबच्या मते,पाकिस्तानला जर सर्वात मोठा धोका कोणाकडून असेल तर तो फक्त भारताकडूनच आहे. कारण भारत सोडून अन्य कोणताहि जवळचा देश पाकिस्तानवर हल्ला करू शकत नाही,त्यामुळे भारताला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी आपल्या लष्कराचे बजेट वाढवायला हवे, असे शोएबला वाटत आहे. वेळ पडली तर दोन वेळचे जेवायला मिळाले नाही तरी चालेल, पण लष्कराचे बजेट वाढवायलाच हवे, असे शोएबचे म्हणणे आहे.

- Advertisement -

यावेळी शोएब म्हणाला की, ” जर मला संधी दिली गेली, तर मी एकवेळ गवत खाईन, पण पाकिस्तानच्या लष्कराचे बजेट नक्कीच वाढवेन. सध्या बजेटची सर्वात जास्त गरज आपल्या देशाला आहे. त्यामुळे लष्करावर २० टक्के खर्च करण्यापेक्षा ६० टक्के करायला हवा.”