सासूकडून जावयाला थरारक गिफ्ट! लग्न भेट म्हणून दिली चक्क AK-47; व्हिडिओ व्हायरल

इस्लामाबाद । लग्न समारंभात जावयाचा मान म्हणून अनेकजण वेगवेगळ्या भेटवस्तू देतात. मात्र, एका लग्नात चक्क सासूनेच जावयाला एके-४७ रायफल भेट दिली. पाकिस्तानमध्ये हा प्रकार घडला असून या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. पाकिस्तानमधील लोकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. पाकिस्तानी वृत्तवाहिनी ARY Newsने दिलेल्या वृत्तानुसार, एका लग्न समारंभात सासूकडून जावयाला एके-४७ रायफल भेट देण्यात आली. ही एके-४७ पाकिस्तानी बनावटीची होती. ही रायफल बेकायदेशीपणे बनवण्यात आली असल्याचे म्हटले जाते.

रायफल भेट देण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. त्यानंतर लोकांनी मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला. नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफजाईचे वडील आदिल युसूफजाई यांनी देखील ट्विट करून नाराजी व्यक्त केली. लग्नातील ही सर्वात वाईट भेट असल्याचे त्यांनी म्हटले. भारतीय इतिहास संशोधक इरफान हबीब यांनी देखील नाराजी व्यक्त करत यामुळे पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र असल्याचे म्हटले.

पाकिस्तान-भारतासह दक्षिण आशियातील काही देशांमध्ये लग्न समारंभा दरम्यान हवेत गोळीबार करणे ही सामान्य बाब समजली जाते. या गोळीबारात काही वेळेस अनुचित घटना घडून काहीजणांना आपला प्राणही गमवावा लागला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like