18 वर्षे पूर्ण होण्याआधीही बनवू शकाल पॅनकार्ड, त्यासाठीची प्रक्रिया जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । मुलांनी शिक्षण पूर्ण करून इनकमचा विचार करणे ही पूर्वीची गोष्ट झाली. आधी नोकरी किंवा व्यवसायाचेही वय असायचे. मात्र बदलत्या काळात जुन्या परंपराही बदलल्या आहेत.

इंटरनेटचे जग असो वा उद्योजकता, लहान मुलेही कमाईत मोठ्यांना मागे टाकत आहेत. आता अशा परिस्थितीत, जेव्हा मुले कमवू लागतात, तेव्हा त्यांना PAN Card देखील आवश्यक असतो. तसेच, कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारी कागदपत्रांमध्ये पॅन कार्ड आवश्यक असते. आर्थिक व्यवहारांसाठी तर पॅन कार्ड बंधनकारकच आहे.

साधारणपणे, 18 वर्षांचे झाल्यावरच पॅनकार्ड बनवले जाते, मात्र आता ते वयात येण्याआधीही बनवले जाऊ शकते. जर एखाद्या अल्पवयीन व्यक्तीने स्वतः पैसे कमावले असतील किंवा त्याच्या पालकांना मुलाच्या नावावर गुंतवणूक करायची असेल, तर त्यासाठी पॅन कार्ड आवश्यक असेल.

मात्र तुम्हाला हे माहित आहे का की तुम्ही तुमच्या मुलांसाठी देखील पॅन कार्ड मिळवू शकता. म्हणजेच, जर तुमच्या मुलाचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असेल, तर तुम्ही त्याच्या पॅन कार्डसाठी अर्ज करू शकता. जरी कोणताही अल्पवयीन पॅन कार्डसाठी अर्ज करू शकत नसला तरी त्याचे पालक त्यांच्या वतीने मुलाच्या पॅन कार्डसाठी अर्ज करू शकतात.

पॅन कार्डसाठी अर्ज करण्यासाठी, तुम्हाला NSDL च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. तुम्हाला http://www.onlineservices.nsdl.com ला भेट द्यावी लागेल. या वेबसाइटवर तुम्ही पॅन कार्डसाठी ऑनलाइन पॅन अर्ज करू शकता.

पॅन कार्डसाठी अर्ज करण्यासाठी, पालकांना अल्पवयीन मुलाच्या वयाच्या पुराव्यासह इतर अनेक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. अर्जासोबत पालकांचे सिग्नेचरही अपलोड केले जातात. येथे तुम्हाला पॅन कार्ड फी म्हणून 107 रुपये ऑनलाइन जमा करावे लागतील. या संपूर्ण प्रक्रियेनंतर 15 दिवसांनी तुम्हाला तुमचे पॅन कार्ड मिळेल.

या संपूर्ण प्रक्रियेत तुम्हाला ज्या कागदपत्रांची आवश्यकता असेल त्यामध्ये तुमच्या ऍड्रेस प्रूफ, तुमचे ओळखपत्र, अल्पवयीन व्यक्तीचे आधार कार्ड, अल्पवयीन व्यक्तीचे ओळखपत्र आणि काही महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक आहेत.

Leave a Comment