गैरहजर शिक्षकांवर पंचायत समिती कारवाई करणार ः राजाभाऊ शेलार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण | शासनाच्या आदेशानुसार नियमांची अमंलबजावणी करत ऑफलाइन शाळा सुरू झालेल्या आहेत. तरीही पाटण तालुक्यातील जे शिक्षक शाळेत पूर्णवेळ उपस्थित राहत नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ शेलार यांनी दिला.

पाटण पंचायत समितीची मासिक सभा छ. शिवाजी महाराज सभागृहात आयोजित केली होती. अध्यक्षस्थानी सभापती राजाभाऊ शेलार होते. यावेळी गटविकास अधिकारी मीना साळुंखे, उपसभापती प्रतापराव देसाई, स. गटविकास अधिकारी व्ही. बी. विभुते उपस्थित होते. सभेत शिक्षण, आरोग्य विभाग, विद्युत महामंडळ, तालुका कृषी विभाग, पाणीपुरवठा विभाग, लघू पाटबंधारे, जि. प. बांधकाम विभागाचा आढावा देण्यात आला.

अडूळला 15 दिवसात शिक्षक मिळणार

सभेत शिक्षण विभागाचा आढावा देताना, तालुक्यातील 610 शाळा सुरू आहेत. 1072 मुलं लसीकरण न झालेली आहेत. 67 पैकी 40 शाळांमध्ये शंभर टक्के लसीकरण झालेले आहे. इन्सपायर अवाॅर्डमध्ये तालुक्यातील 42 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. दहावी, बारावी परिक्षेबाबत प्रत्येक शाळा तिथे बोर्ड नियोजन आहे. यामध्ये बदल ही होऊ शकतो. पंधरा पेक्षा कमी पटाच्या 4 शाळा जवळील शाळेला जोडण्यात येतील. मनरेगाच्या माध्यमातून शंभर शाळांंचा दुरुस्ती प्रस्ताव दिले होते. यामधील वीस शाळांची कामं झालेली आहेत. तालुक्यात शिक्षकांची 216 पदं रिक्त आहेत. यावेळी अडूळ येथे शिक्षक नसल्याने शाळेला टाळे ठोकणार असा इशारा देण्याऱ्या ग्रामस्थांना दिलासा देत सभापती शेलार यांनी येणाऱ्या 15 दिवसात शिक्षक देणार असा दिलासा दिला.

बनपेठ आता “क्षेत्र येराड”

ग्रामपंचायत विभागाचा आढावा देताना, सन 2022-23 ची अंदाजपत्रक तयार झाली आहेत. कोरोना काळात कोरोनाने मृत झालेल्या लोकांच्या वारसांना मिशन वात्सल योजनेच्या अंतर्गत घरकुल देण्यात येणार आहेत. बनपेठवाडी गावाच्या नावात बदल करुन “क्षेत्र येराड” करण्यात यावा असा ठराव घेण्यात आला. यानंतर पं स कृषी विभागाचा आढावा घेण्यात आला.

Leave a Comment