कोल्हापूरला पुन्हा महापुराचा धोका? पंचगंगेची पातळी वाढली 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । गेल्यावर्षी राज्यात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. कोल्हापूर, सांगली तसेच सातारा जिल्ह्यात महापूर आला होता. गेल्यावर्षी या तीनही जिल्ह्याना महापुराचा मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वित्तीय हानी झाली होती. अनेक जनावरे मृत झाली होती. त्यामुळे यावर्षी या परिसरात सध्या पावसामुळे पुन्हा मागच्या वर्षीसारखी स्थिती होणार नाही ना याची भीती दाटली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सलग तीन दिवस पाऊस सुरु आहे. पंचगंगा नदीची पातळी वाढली असून ती १५ फुटांवर गेली आहे.

जिल्ह्यातील सर्वच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस असल्याने धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. पावसाचा कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात अद्यापही जोर कायम आहे. मुसळधार पावसाने पंचगगा नदीची पाणी पातळी दिवसभरात तीन फुटांनी वाढली असून बुधवारी सायंकाळी ती २४  फुटांवर येऊन पोहचली. जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील २० बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे बंधाऱ्यावरील वाहतूक इतर मार्गावर वळवण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत गगनबावडा तालुक्यात १३९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

महापुराची स्थिती आल्यास काय करावे याचे नियोजन यावर्षी प्रशासनाने पूर्वीच केले आहे. पूर रेषेत येणाऱ्या परिसरातील नागरिकांना पावसाच्या आधीच स्थलांतरित होण्यास सांगितले आहोत. जिल्ह्याच्या पश्चिम भागात दोन दिवसांपासून संततधार सुरु आहे. जिल्ह्यातील सर्वच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस असल्याने धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे पंचगगा नदीचे पात्र विस्तारलेले असून त्यामध्ये पोहोण्यासाठी काही उत्साही तरुणांनी उड्या मारत आनंद लुटला. त्याचबरोबर मासेमारी करणाऱ्याची संख्याही वाढली.

Leave a Comment