साताऱ्यात दहशत अन् स्टाईल चालणार नाही ; आदित्य ठाकरेंचा उदयनराजेंना टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोरेगाव प्रतिनिधी | सकलीन मुलाणी

 साताऱ्यात दहशत अन् स्टाईल काय घेऊन बसलात, नवीन डायलॉगचे फॅड आले असून तरुण पिढी, आता माझी सटकली आणि अपना टाईम आयेगा हाच डायलॉग म्हणत वावरत आहे. साताऱ्याची हवा बदलली असून, परिवर्तन अटळ आहे असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. ते शिवसेनेचे उमेदवार नरेद्र पाटील यांच्या प्रचार सभेत बोलत होते.

 सातारा जिल्ह्यात खूप काही करण्यासारखे आहे, मात्र दहशतीमुळे येथे उद्योग व्यवसाय कारखानदारी येत नाही. काहीही झाले तरीही देशात पुन्हा एनडीएचे सरकार येणार आहे. त्यामुळे विरोधी पक्षात बसणारा खासदार हवाच कशाला. विरोधक देश तोडायला निघालेत. त्यामुळे देश अखंड व भगवा ठेवण्यासाठी महायुतीला मत द्या. साताऱ्यातील दहशतीला का घाबरता? साताऱ्यामध्ये नरेंद्र पाटील यांना मत म्हणजेच दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी यांना मत असे समजून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्ट लोकांना घरी बसवा, असे आवाहन शिवसेनेच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे केले.

कोरेगाव येथील बाजार मैदानावर शिवसेना, भारतीय जनता पार्टी, रिपाई व मित्रपक्ष महायुतीचे सातारा लोकसभा मतदार संघातील उमेदवार ना. नरेंद्र पाटील यांच्या प्रचारनिमित्त येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री विजय शिवतारे, शिवसेनेचे उपनेते नितिन बानुगडे- पाटील, ना. नरेंद्र पाटील, माजी आमदार दगडू सपकाळ, पुरुषोत्तम जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंत शेलार, चंद्रकांत जाधव, रणजित भोसले, मालोजी भोसले, दत्ताजीराव बर्गे, निलेश बर्गे, अक्षय बर्गे, आदी प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री शिवतारे म्हणाले, साताऱ्याच्या खासदारांना दहा वर्षात काही करता आले नाही. काँग्रेसचे सरकार असताना त्यांना कसलीही ठोस विकासकामे करता आली नाहीत. साताऱ्यातील दादागिरी थांबवण्यासाठी शिवसेनेचे संवेदनशील उमेदवार नरेंद्र पाटील यांना बहुमताने निवडून द्या.

ना. नरेंद्र पाटील म्हणाले, या निवडणुकीत मी उदयनराजेंना पाडणारच आहे. निकालानंतर ते माजी खासदार होतील. गेल्या दहा वर्षात काय कामे केली असा प्रश्न विचारला तर ते शत्रुघन सिन्हा सारखं खामोश असा डायलॉग मारतात. पैशासाठी सोना अलाइज कंपनी बंद पाडून अडीच हजार कामगारांना बेकार करणारे हे गरिबांच्या जिवावर जगतात. गेल्या दहा वर्षात खासदांननी किती विकास केला. किती कारखाने घालवलेत याचा हिशोब दिला पाहिजे. भाजप शिवसेनेने केलेले कामे आपण केल्याचे सांगतात. दुसर्‍याच्या पोराला आपलं पोर आहे, असे किती दिवस सांगणार आहात, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

रणजित भोसले यांनी प्रास्ताविक केले. नितिन बानुगडे पाटील, शारदा जाधव, शेलार, यशवंत घाडगे आदींची भाषणे झाली. यावेळी शिवसैनिक, भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सातारा लोकसभा मतदारसंघाच्या ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे –

दहा वर्षात उदयनराजेंनी जिल्ह्याचे वाटोळे केले, पंजाबराव पाटील यांचा गंभीर आरोप

शिवेंद्रराजेंना मीच निवडूण आणणार – उदयनराजे भोसले

पुरूषोत्तम जाधवांचा शिवसेनेत प्रवेश, उदयनराजे भोसलेंच्या विरोधात लढवणार लोकसभा

स्मिता आर आर पाटील यांना सांगली लोकसभा मतदार संघातून उमेदवारी द्या

उदयनराजे भोसले यांच्या विरोधात तृथीयपंथी उमेदवार रिंगणात

साहेब आपण आपल्या निर्णयाचा पुर्नविचार करा, रोहित पवारांची आजोबांना भावनिक साद

नगरमध्ये राष्ट्रवादीकडून सुजय विखेंना प्रतिस्पर्धी कोण ?

Leave a Comment