तुमच्या मुलाला कृषी कायदे रद्द करण्यास सांगावे ; पंजाबच्या शेतकऱ्याचे थेट मोदींच्या आईंना पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात देशभरातील शेतकरी आक्रमक झाला असून शेतकऱ्यांनी सरकार विरोधात आंदोलन पुकारलं आहे. पण तब्बल 60 दिवस होऊन देखील आंदोलक शेतकरी आणि केंद्र सरकार यावर तोडगा काडू शकले नाहीत. याच दरम्यान पंजाब मधील एका शेतकऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी यांना एक भावनिक पत्र लिहिले आहे. यात त्यांना असा आग्रह करण्यात आला आहे की, त्यांनी आपल्या मुलाला कृषी कायदे रद्द करण्यास सांगावे.

नरेंद्र मोदी यांचे मन वळविण्यासाठी आपल्या सर्व शक्तींचा उपयोग त्या एक आई म्हणून करतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यातील रहिवासी हरप्रीत सिंह यांनी हिंदीत हे पत्र लिहिले आहे. देशाच्या एकूण विकासात शेतकऱ्यांचे योगदान आणि इतर अनेक मुद्दे पत्रात लिहिले आहेत. सिंह यांनी म्हटले आहे की, मी हे पत्र जड अंत:करणाने लिहित आहे. आपणास ठाऊक असेल की, शेतकरी थंडीतही दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करीत आहे.

हे पत्र मी भारी मनाने लिहित आहे. आपल्याला माहितीच असेल की देश आणि जगाला पोसणाऱ्या तीन काळ्या कायद्यांमुळे शेतकरी या हिवाळ्यात दिल्लीच्या रस्त्यावर झोपायला लागतात. वृद्ध, 90-95 वर्षे वयोगटातील मुले आणि स्त्रिया देखील अशा थंडीत आंदोलन करण्यास भाग पाडतात. थंडीमुळे लोक आजारी पडत आहेत. अगदी बरीच शेतकरी शहीद होत आहेत. या परिस्थिती आपल्या सर्वांसाठी चिंतेचे कारण आहेत.

दिल्लीच्या सीमेवरची ही शांततापूर्ण चळवळ अदानी, अंबानी आणि अन्य कॉर्पोरेट गृहांच्या आदेशानुसार तीन काळे कायदे मंजूर झाल्यामुळे झाली आहे. असेही त्या पत्रात लिहिलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment