वाघांनो असं रडताय काय? पंकजा मुंडेंचं नाराज कार्यकर्त्यांना ‘हे’ आवाहन

बीड प्रतिनिधी | भारतीय जनता पक्षाने पंकजा मुंडे, एकनाथ खडसे यांची उमेदवारी डावलून नवीन चेहर्‍यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर केली. यानंतर मुंडे यांच्या कार्यकर्त्यांत नाराजी पसरली. दिवसभर पंकजा मुंडे यांना अनेकांनी फोन केले मातंर मुंडे यांनी कोणाचेही फोन उचलले नाहीत. आता मुंडे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून एक ट्विट केले आहे. त्यात वाघांनो असं रडताय काय? असं म्हणत मुंडे यांनी कार्यकर्त्यांना उत्तर दिलंय.

आईंना, ताईंना फोन करून दुःख व्यक्त करताय ठीक आहे पण वाघांनो असं रडताय काय? असं म्हणत पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना धीर दिला आहे. मी आहे ना, ‘तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही’ बस साहेबांचे आशिर्वाद आहेत असं म्हणत मुंडे यांनी ट्विट केले आहे.

दरम्यान, दिवसभर फोन उचलले नाही. कुणाकुणाला उत्तर देऊ? असं म्हणत भाजप पक्षाने माझी उमेदवारी डावलून नव्या चेहर्‍यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्याचा निर्णयाने मला धक्का अजिबात बसलेला नाही असं स्पष्ट केले आहे. तसेच भाजप च्या त्या चार ही उमेदवारांना आशिर्वाद! असं म्हणत मुंडे यांनी अखेर आपला अबोला सोडला आहे.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

You might also like