तर मी धनंजयसाठी राजकारण सोडलं असतं – पंकजा मुंडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | “आमच्या घराण्याची राजकीय ताकद मोठी होती, बाबा मंत्री असल्याने त्यांचा जिल्ह्यात वचक होता. लोकांच्याआग्रहास्तव मी राजकारणात आले. मुंडे साहेबांनी धनंजयला आमदार केले. मात्र एवढं सारं करूनही धनंजय राष्ट्रवादीत गेला. जर धनंजय भाजपात राहिला असता तर मी त्याच्यासाठी राजकारणही सोडलं असतं” असं वक्तव्य ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकज मुंडे यांनी केले आहे. मुंबई मधील एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

‘राजकारणात असं एकही घराणं नाही जिथ मतभिन्नता नाही. मात्र प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा मुंडे कुटुबियांचीच जास्त होते’ अशी खंत हि पंकजा यांनी यावेळी बोलून दाखवली. ‘धनंजय ने माझ्यावर आजपर्यंत अनेक आरोप केले, भ्रष्टाचाराचे आरोप केले. परंतु ते सगळे आरोप बिनबुडाचे निघाले. माझ्या भावाने माझ्यावर आरोप केले याच मला दुखः आहे’. असं हि पंकजा मुंडे म्हणाल्या.

दरम्यान, लंडनमधल्या हॅकरने गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाबद्दल व्यक्त केलेली शक्यता पंकजा मुंडे यांनी फेटाळून लावली. सीबीआय आणि पोलिसांनी तो अपघात होता हे स्पष्ट केलं आहे आणि त्यांच्यावर माझा विश्वास आहे असंही त्या म्हणाल्या. तसेच त्या हॅकरने सांगितलेल्या गोष्टीत कुठलाही खरेपणा जाणवत नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि  हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी  आजच आमचा  WhatsApp  ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729

Facebook Page – Hello Maharashtra

 

इतर महत्वाचे –

भाजपच्या काळात नोकरीही नाही अन् छोकरीही नाही – धनंजय मुंडे

लपून वार करू नका, समोरून वार करा – पंकजा मुंढे

म्हणून मी पेरु समाधीवर ठेवला आणि दर्शन घेतले – पंकजा मुंडे

 

Leave a Comment