विधानपरिषदेच्या उमेदवारीबाबत पंकजा मुंडे, म्हणाल्या..

मुंबई । येत्या २१ मे रोजी विधान परिषदेच्या ९ जागांसाठी महाराष्ट्रात निवडणूक होत आहे. या निवडणूकीचे आता वारे संपूर्ण राजकीय वर्तुळात वाहू लागले आहेत. महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या ९ जागांपैकी भाजप ४ जागांवर निवडणूक लढवत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर भाजपाच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरील मेळाव्यात पक्षाच्या कोअर कमिटीचा राजीनामा देत नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर पक्षाने त्यांना विधान परिषदेवर संधी देत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात असली तरी पंकजा मुंडे यांनी मात्र गोष्टीच खंडन केलं आहे.

खुशखबर! मुंबई, पुण्यात अडकून असलेल्यांची शासन करणार एसटीनं मोफत घरी पाठवणी

पंकजा मुंडे यांच्याकडून परळी तहसीलमधून कागदपत्रांची जमवाजमव सुरू केली आहे. त्यामुळे त्या विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपाकडून पंकजा यांची उमेदवारी निश्चित असल्याच्या चर्चेला उधाण आलं असताना पंकजा यांनी ट्विटरवर याबाबत खुलासा केला आहे.“कोणाच्याही उमेदवारीसाठी पक्ष श्रेष्टीकडून कोणताही अंतिम निर्णय झाला नाही. सर्व संभाव्य नावांसाठी कोरोनाच्या बंधनामुळे कागदपत्रे जमा करून ठेवण्यात येत आहेत. माझ्या ई-मेल वरून माझ्या पीएने परस्पर विधानसभेतील मथळा उतरवला. त्यानंतर तो कोणीतरी व्हायरल केला. बातमी झाल्यावर मला याची कल्पना आली, स्पष्ट करत आहे,” असं ट्विट करुन पंकजा मुंडे यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे.

 

दरम्यान, महाराष्ट्र राज्य विधानपरिषद ९ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक होत आहे. भाजपा ३ ते ४ जागा जिंकू शकते. यासाठी पक्षाने ओबीसी गटातील प्रभावी नेत्या पंकजा मुंडे यांची उमेदवारी निश्चित केल्याचे संकेत आहेत. पंकजा मुंडे यांच्याकडून उमेदवारी भरण्यासाठी परळी तहसील कार्यालयातून आवश्यक कागदपत्रे मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. भाजपापासून दुरावलेल्या ओबीसी समूहाला जोडण्यासाठी पंकज यांच्याकडे काही दिवसातच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपदही दिले जाण्याची शक्यता समर्थकातून व्यक्त केली जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

You might also like