परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आज आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी कुलगुरू कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी कुलगुरू कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजीही केली आहे.
विद्यापीठातील वसुतीगृह शुल्क कमी करण्यात यावे, कृषी पदवीला व्यवसायिक दर्जा घोषित करावा. परीक्षेनंतर ४५ दिवसांमध्ये निकाल लावण्याची जबाबदारी पार पाडावी. तसेच २०१९ साली विद्यापिठात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ वस्तीगृह उपलब्ध करून द्यावे.
अशा विविध मागण्यांसाठी विद्यार्थी आक्रमक झाले असून, आज कुलगुरूंना भेटून त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे. यावर विद्यापीठाकडून लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेण्यात यावा, अन्यथा येणाऱ्या पाच तारखेपासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.
हे पण वाचा-
राष्ट्रीय स्वयंसेवकसंघावर कायदेशीर बंदी घालण्यासाठी पुढाकार घ्या!- राजरत्न आंबेडकर
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा पिकांना फटका; गहू, ज्वारीसोबत फळबागांचे लाखोंचे नुकसान