धक्कादायक ! परभणी जिल्ह्यात कोरोना रुग्ण बाधीतांच्या संख्येत ३१ ने वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे

परभणी जिल्हावाशीयांसाठी मंगळवारची रात्र टेन्शन देणारी ठरली असून संध्याकाळी साडे आठ वाजता आलेल्या रुग्ण तपासणी अहवालाने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आज सायंकाळपर्यंतची ३६ रुग्णसंख्या आता जवळजवळ दुप्पट होत ६७ वर पोहोचली आहे. सापडलेले ३१ रुग्ण पूर्वी सापडलेल्या तालुक्यांमधीलच असल्याची आकडेवारी सांगत आहे. जिल्ह्यात मागील आठवड्यापासून कोरोणा संसर्ग बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे .सापडलेले सर्व रुग्ण मुंबई पुणे येथून आल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांच्या संपर्कातील व संशयित जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांचे तपासणी अहवाल आज साडेआठ वाजता आले असता यातील ३१जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

त्यामध्ये पूर्णा तालुक्यात १० ,सेलू मध्ये २, गंगाखेड ४,पालम १ तर परभणी तालुक्यामध्ये १२ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत २६५जणांचे तपासणी अहवाल नांदेड येथील प्रयोगशाळेमध्ये हे प्रलंबित होते पैकी ३४ अहवाल अनिर्णायक आहेत. असे प्रशासनाकडून सांगण्यात आलयं.

जिल्ह्यात अत्यंत वेगाने वाढणारी कोरोना ग्रस्तांची संख्या आता चिंता वाढवत असून वाढती रुग्णसंख्या पाहता , प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनाकडून २६ मे सकाळी सात वाजल्यापासून ते २८ मे संध्याकाळी बारा वाजेपर्यंत जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे . त्यामध्ये शहर व नगरपालिका हद्दीतील तीन किमी पर्यंत संचारबंदी करण्यात आली आहे. आता जिल्ह्यातील नागरिकांनी घरातच रहात जिल्हा प्रशासनाला सहकार्य करत काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

Leave a Comment