साताऱ्यातील निर्मल स्कूलच्या फीवाढी विरोधात पालक आक्रमक; आंदोलनाचा इशारा

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सध्या कोरोना परिस्थिती असल्याने तसेच लॉकडाऊनमुळे सर्व लोकांची आर्थिक उत्पन्न साधने बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची यंदाची आणि मागील वर्षाची शाळेची ऑनलाइन शिक्षण पद्धतीची असलेली फी कमी करावी तसेच ती कमी प्रमाणात आकारण्यात यावी याबद्दल सोमवारी निर्मला कॉन्व्हेंट स्कूल सातारा येथे जाऊन विद्यार्थी व पालक यांनी स्कुलच्या प्रशासनास निवेदन दिले. मात्र, निवेदनास प्रशासनाने केराची टोपली दाखवली. मागील वर्ष आणि चालू वर्षांमध्ये 50 टक्के सवलत मान्य करावी अन्यथा आंदोलन करू, असा इशारा विद्यार्थी व पालकांनी दिला आहे.

पालक स्वप्नील राऊत यांच्यावतीने स्कुलच्या प्रशासनास देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटल आहे कि,
निर्मल स्कूलच्या प्रशासनाने मागील वर्ष आणि चालू वर्षांमध्ये 50 टक्के सवलत मान्य करावी, अशी मागणी करणारे अर्ज दिले होते. मात्र, दिलेल्या अर्जाला स्कुलच्या प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे. आजपर्यंतची शालेय फी व इतर मागण्या लक्षात घेत विनातक्रार वेळेवर फी पालक भरत आलेले आहेत. परंतु मागील महिन्यापासून जागतिक स्तरावरील कोव्हीड-१९ प्रसारामुळे सरकारने जो दोनवेळा लॉकडाऊन घोषीत केला. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांना आपले व्यवसाय बंद करावे लागले. उत्पनाचेच सर्व मार्ग बंद असल्याने बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. तरीसुध्दा क्काही पालकांनी निम्मी फी भरलेली आहे.

तरी स्कुलच्या प्रशासनाने मागील वर्ष व चालू वर्षामध्ये ५० टक्के फी मध्ये सवलत द्यावी व पालकांनी केलेली मागणी मान्य करावी. जी ऑनलाईन शिक्षण सुविधा स्कुलमध्ये आहे. तेवढीच फी आकारण्यात यावी व योग्य तेवढीच टयुशन फी आकारावी, असे निवेदन स्कुलला पालकांच्यावतीने देण्यात आले होते. मात्र, स्कुलच्या प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले असल्याने स्कुलच्या या प्रकाराविरोधात पालक आक्रमक झाले आहेत. त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

You might also like