अभिनेते परेश रावल यांची नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा च्या अध्यक्षपदी नियुक्ती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अभिनेता आणि गुजरातचे भाजपचे माजी खासदार परेश रावल यांची गुरुवारी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी परेश रावल यांची नेमणूक केली.

एनएसडीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त झालेल्या अभिनेता परेश रावल यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की हे काम आव्हानात्मक असेल पण मजेदार असेल. केंद्रीय मंत्री प्रह्लादसिंग पटेल यांनीही परेश रावल याना देण्यात आलेल्या नव्या जबाबदारी बद्दल माहिती दिली. त्यांनी रावल यांचे अभिनंदन केले आणि लिहिले की, ‘प्रख्यात कलाकार परेश रावलजी यांची महामहिम राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांनी एनएसडी अध्यक्ष म्हणून नेमणूक केली आहे. त्यांच्या कलागुणांचा फायदा देशातील कलाकार आणि विद्यार्थ्यांना होईल. हार्दिक अभिनंदन.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment