पश्चिम सुपनेत गड आला पण सिह गेला; अवघ्या दोन मतांनी सरपंच विजयी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील 33 ग्रामपंचायतीच्या मतमोजणीस सुरुवात झाली असून कराड तालुक्यातील पश्चिम सुपने ग्रामपंचायत निकाल पहिला हाती आला आहे. यामध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई आणि ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या गटांनी 4 जागांवर विजय मिळवला आहे. तर विरोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने सरपंच पदावर विजय मिळवला. कराड तालुक्यात सुपने ग्रामपंचायत निवडणुकीत गड आला पण सिह गेला आहे.

पश्चिम सुपने ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रावण कोळी यांनी केवळ 2 मतांनी विजय मिळवला आहे. या ठिकाणी वार्ड क्रमांक एक मधून भिकाजी गायकवाड 187 मते, लता थोरात 191 मते, तात्यासो गायकवाड 138 मते, संगीता चव्हाण 168 मते हे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाचे उमेदवार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार जयश्री गायकवाड यांना 184 तर विशाल उत्तम कळंबे 97 मते मिळालेली आहेत. तसेच प्रियंका विशाल चव्हाण व सुजाता रमेश चव्हाण यांना वार्ड क्रमांक तीन मध्ये 106 समसमान मते पडल्याने त्यांचा निकाल चिट्टीवर ठरणार आहे.