शेतकऱ्यांची 1 हजार 530 कोटीची थकीत एफआरपी द्या, अन्यथा आक्रमक आंदोलन : राजू शेट्टी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी

राज्यात आज 23 जिल्ह्यात जवळपास साडेआठ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिके अतिवृष्टी व महापूरामुळे नष्ट झालेली आहेत. तरी अद्यापही सरकारने मदत जाहीर केलेली नाही. अनेक जमिनी वाहून गेलेल्या असून विहीरी कोसळल्या आहेत.  महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे आजही 1 हजार 530 कोटीची एफआरपी थकीत आहे, याबाबत शासनाने ठोस कार्यवाही न केल्यास आक्रमक आंदोलन करण्याचा निर्णय झाल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.

कराड तालुक्यातील खोडशी येथे आयोजित स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकारणीच्या बैठक प्रसंगी त्यांनी हॅंलो महाराष्ट्रशी संवाद साधला. यावेळी रविकांत तुपकर, प्रदेशाध्यक्ष  संदीप जगताप, प्रा. जालिंदर पाटील, सावकार मदनाईक, देवानंद पाटील यांच्यासह राज्यातील संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/1257640471717068

स्वाभिमानी शेतकरी संघटना सर्व स्वतंत्र निवडणुका लढविणार

आम्हांला स्वाभिमानी शेतकरी संघटना म्हणून जिथे- जिथे निवडणुका लढणे शक्य आहे, तिथे स्वतंपणे उमेदवार उभे केले जातील. आम्ही आज निवडणुका सत्ता प्राप्तीसाठी नव्हे, तर राजकारण एवढे गलिच्छ झाले आहे. सर्वसामान्य माणसाला राजकारणाचा वीट आला आहे. प्रस्थापित सर्वच राजकीय पक्ष जनतेच्या मनातून उतरलेले आहेत. अशा परिस्थिती स्वच्छ, कार्यक्षम व बुध्दीवादी चेहरा देण्याचा प्रयत्न राहील, असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.