Paytm चे संस्थापक विजय शेखर शर्मा यांना दररोज होत आहे 88 कोटींचे नुकसान

नवी दिल्ली I पेटीएमच्या शेअर्समध्ये झालेल्या मोठ्या घसरणीमुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारच नव्हे तर पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांचेही मोठे नुकसान झाले आहे. विजय शेखर शर्मा यांना दररोज 88 कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. यामुळेच ते आता डॉलर्समध्ये अब्जाधीशांच्या लिस्ट मधून बाहेर पडले आहेत. मात्र, त्यांची संपत्ती रुपयात मोजली तर ते अजूनही अब्जाधीश आहेत.

फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार, शर्मा यांची संपत्ती IPO च्या लिस्टिंग पूर्वी $2.35 अब्ज होती, जी आता 99.9 कोटी डॉलर्सवर आली आहे. Paytm ची मूळ कंपनी असलेल्या One97 Communications 18 नोव्हेंबर 2021 रोजी लिस्ट झाली. लिस्ट झाल्यापासून शर्मा यांना दररोज सुमारे 88 कोटी रुपयांचे नुकसान होत आहे.

फोर्ब्सने सांगितले – शर्मा आता अब्जाधीश राहिलेले नाहीत
फोर्ब्स या आंतरराष्ट्रीय मासिकाच्या 16 मार्चच्या आकडेवारीनुसार पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा आता अब्जाधीश राहिलेले नाहीत. One97 Communications या मुख्य Paytm ची मूळ कंपनी असलेल्या शेअरमध्ये सातत्याने घट होत आहे. विशेष म्हणजे, पेटीएमचा स्टॉक त्याच्या इश्यू प्राईस पासून 70 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. पेटीएम शेअरची इश्यू प्राईस 2,150 रुपये होती जी आता 620 रुपयांवर आली आहे.

IPO मधून 18,300 कोटी रुपये जमा झाले
Paytm ची मूळ कंपनी One97 Communications ने IPO द्वारे 18,300 कोटी रुपये उभे केले होते. 18 नोव्हेंबर रोजी ही कंपनी भारतातील 1.39 लाख कोटी रुपयांच्या टॉप 50 कंपन्यांमध्ये होती. आता कंपनीची मार्केट कॅप सुमारे 1 लाख कोटी रुपयांनी घसरून 40,000 कोटी रुपयांवर आले आहे. सर्वोच्च मूल्य असलेल्या कंपन्यांच्या लिस्टमध्ये ती आता 112 व्या स्थानावर आहे.