आता Amazon आणि Phonepe वर देखील वापरता येणार Paytm Wallet बॅलन्स, यासाठीची प्रक्रिया जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी ई-वॉलेट कंपनी पेटीएमने अलीकडेच प्रीपेड RuPay कार्ड पेटीएम वॉलेट ट्रान्झिट कार्ड लाँच केले आहे. हे कार्ड सर्व व्यापारी आउटलेट्स किंवा ऑनलाइन वेबसाइटवर वापरले जाऊ शकते जिथे RuPay कार्ड स्वीकारले जा त. हे कार्ड एक प्रीपेड कार्ड आहे जे तुमच्या पेटीएम वॉलेट बॅलन्सशी लिंक केले जाईल म्हणजेच या कार्डद्वारे तुम्ही वॉलेट बॅलन्स देखील वापरू शकता.

हे कार्ड रुपे प्लॅटफॉर्मवर लॉन्च करण्यात आले आहे. सध्या ते व्हर्च्युअल कार्डच्या स्वरूपात दिले जात असून लवकरच फिजिकल कार्डही दिले जाणार आहे. एक्सपायरी डेट आणि CVV नंबर असलेले हे 16 अंकी कार्ड असेल. या कार्डद्वारे, तुम्ही तुमची पेटीएम वॉलेट बॅलन्स सर्वत्र ऑनलाइन आणि ऑफलाइन वापरण्यास सक्षम असाल जिथे रुपे कार्डद्वारे पेमेंट केले जाते.

पेटीएम वॉलेट कार्ड POS वर स्वाइप करण्यास सक्षम असेल
उदाहरणार्थ तुमची पेटीएम वॉलेट बॅलन्स 500 रुपये आहे आणि तुम्ही स्वाइप मशीन (POS) असलेल्या दुकानातून वस्तू खरेदी करत आहात मात्र पेटीएम वॉलेट पर्याय नाही. अशा परिस्थितीत, तुमच्या फिजिकल पेटीएम वॉलेट कार्डच्या मदतीने तुम्ही स्वाइप मशीनद्वारे 500 रुपयांचे पेमेंट करू शकाल.

पेटीएम वॉलेट मनी अ‍ॅमेझॉनवर वापरता येते
त्याचप्रमाणे, कोणताही ऑनलाइन व्यापारी जो पेटीएम वॉलेटमधून पेमेंट घेत नाही, त्याला डेबिट/क्रेडिट कार्डचा पर्याय निवडावा लागेल आणि पेटीएम वॉलेट कार्डचा 16 अंकी क्रमांक, एक्सपायरी डेट आणि सीव्हीव्ही नंबर टाकून पेमेंट करावे लागेल. याचा अर्थ पेटीएम वॉलेट ट्रान्झिट कार्डद्वारे तुम्ही अ‍ॅमेझॉन, फोनपेसह अनेक वेबसाइटवर पेटीएम वॉलेट बॅलन्स खर्च करू शकता.

पेटीएम वॉलेट ट्रान्झिट कार्ड ऍक्टिव्ह करण्याचा पर्याय कुठे मिळेल
सर्वात आधी पेटीएम अ‍ॅप उघडा. होम पेजवर, My Paytm सेक्शनमध्ये जा आणि Paytm Wallet वर क्लिक करा. तेथे तुम्हाला तळाशी पेटीएम वॉलेट कार्ड एक्टिवेट करण्याचा पर्याय मिळेल. सध्या काही निवडक युझर्सनाच हे कार्ड दिले जात आहे.

Leave a Comment