Wednesday, February 1, 2023

छोटे व्यापारी आणि इतर दुकानदारांना Paytm देणार स्वस्त कर्ज, सोबतच ‘या’ सुविधा मिळणार

- Advertisement -

नवी दिल्ली । फायनान्शियल सर्व्हिसेस प्लॅटफॉर्म पेटीएम (Paytm) ने आता छोटे व्यापाऱ्यांसाठी 5,00,000 रुपयांपर्यंतच्या व्याजदराद्वारे कर्ज देण्याची तयारी करत आहे. छोट्या व्यापाऱ्यांसाठी पेटीएम दररोज EMI जमा करणारे प्रोडक्टस तयार करत आहे. पेटीएम बिझिनेस अ‍ॅपमध्ये (Paytm Business App) कंपनी ‘Merchant Lending Program’ सेक्शन अंतर्गत कोलॅटरल फ्री लोन (Paytm Collateral Free Loan) करते. त्यांच्या दैनंदिन व्यवहाराच्या आधारे प्लॅटफॉर्मच्या क्रेडिट क्षमतेचे प्लॅटफॉर्म अल्गोरिदम द्वारे मूल्यांकन केले जाते. यानंतर, प्री-क्वॉलिफाइड लोनची रक्कम दिली जाते.

प्रीपेमेंट चार्ज भरायचा नाही
पेटीएमकडून घेणाऱ्यांसाठी कोणताही प्रीपेमेंट चार्ज नाही आहे. तसेच कर्जाच्या रिपेमेंटची रक्कम पेटीएम कडून व्यवसायाच्या दैनंदिन सेटलमेंट रकमेसह जमा केली जाते. गेल्या आर्थिक वर्षात पेटीएमने एकूण 550 कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. पेटीएम कर्जाचा फायदा सुमारे 1 लाख व्यापाऱ्यांना झाला आहे.

- Advertisement -

कर्ज घेण्याची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल आहे
पेटीएमद्वारे कर्ज घेण्याची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल आहे. यात कर्जासाठी अर्ज करण्याची आणि मंजूर कर्ज देण्याच्या प्रक्रियेचा समावेश आहे. एनबीएफसी आणि बँकांच्या पार्टनरशिप नंतर कर्ज अर्जदारास कोणतीही अतिरिक्त डॉक्युमेंट देण्याची गरज नाही.

कोणत्याही मोडमधून पेमेंट घेण्याची सोय आहे
अलीकडेच कंपनीने Paytm All-in-One Android
POS डिव्हाइस लॉन्च केले आहे. याद्वारे 2 लाखाहून अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम स्तरावरील उद्योजक सर्व पेमेंट मोडमध्ये पैसे घेऊ शकतात. यात पेटीएम वॉलेट, सर्व यूपीआय अ‍ॅप्स, डेबिड आणि क्रेडिट कार्ड्स आणि कॅश देखील सामील आहे.

छोट्या आणि किरकोळ विक्रेत्यांसाठी व्यवसाय सुलभ करणे
किराणा स्टोअर सुरू असलेल्यांसाठी ‘पेटीएम फॉर बिझिनेस’ अ‍ॅप हे खूप उपयुक्त ठरत आहे. किरण स्टोअर चालवणाऱ्या दुकानदारांना बँक खात्यात सेटलमेंटबाबतची माहिती सहज मिळते. तसेच, त्यांना सहजपणे पेमेंट देण्याची त्वरित माहिती मिळते. छोट्या शहरांतील किरकोळ विक्रेत्यांना लक्षात घेऊन हे अ‍ॅप 10 प्रादेशिक भाषांमध्ये तयार केले गेले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.