Monday, January 30, 2023

गोव्याची वैभवसंपन्न शांतादुर्गा

- Advertisement -

नऊ दिवस नऊ देवी | प्रणव पाटील

गोव्याच्या शांतादुर्गेचं मंदिर म्हणजे हिंदू मंदिर स्थापत्यावर पोर्तुगीज स्थापत्याचा प्रभाव जाणवणारं पण त्याच बरोबर स्वतः ची गोमंतकीय शैल जपणारं निसर्गाच्या कुशीतील अतिशय सुंदर मंदिर आहे.

- Advertisement -

देवालयाच्या रचनेतील सर्व सौंदर्य मंदिराच्या लाल रंगाच्या उतरत्या छपरांमधे आहे जे लॕटीन वास्तूकलेचा प्रभाव दाखवते, तसेच मंदीरा समोर अष्टकोनी वैशिष्टपूर्ण दिपमाळ आहे.देवालयाच्या गर्भगृहात देवीची पंचशीर धातू प्रतिमा असून देवीचं मूळ मंदिर हे पूर्वी कुठ्ठाळी जवळच्या केळोशीला होते . ते मंदिर पोर्तुगीजांनी उध्वस्त केल्या नंतर त्या गावातील स्थानिकांनी ती मूर्ती वाचवून आजच्या ठिकाणी जिथे हरिजनांच्या वस्तीत आणून ठेवली आणि हरिजनांनी या देवीला जमिन देऊन सामाजिक बंधुत्वाचं उदाहरण घालून दिले . या प्रतिसादा बद्दल हरिजनांना देवालयात बोलवून महाजनांनी त्यांचा गौरव केला.

देवीची मुख्यमूर्ती ही चतुर्भुज असून ती उभ्या स्थिती मधे आहे.देवीच्या दोन्ही हातात शिव आणि विष्णू हे दोन्ही असून एका कथेनुसार शैव आणि वैष्णवां मधील भांडणे थांबवण्यासाठी देवीची स्थापना करण्यात आली त्यामुळे हा संघर्ष थांबून शांतता निर्माण झाली .म्हणूनच देवीला शांतादुर्गा हे नाव मिळाले.

सध्याचे मंदिर हे शाहू छत्रपतींचे सरदार नारो रेगे यांनी १७३० साली बांधले आहे त्याला पुढे पेशव्यांकडून सनदा मिळाल्या ,पुढे हा भाग सौंदेकरांकडे गेला.त्यांनीही देवीला देवीच्या संस्थानाला सनदा बहाल केल्या .आजही केळोशीला ख्रिश्चन झालेले पूर्वाश्रमीचे हिंदू स्त्रीयां अडीअडचणीला देवीचा कौल घेण्यासाठी येतात आणि त्या केळोशीच्या आहेत म्हणून त्यांना पहिला मान ही दिला जातो.

Pranav Patil

प्रणव पाटील
9850903005
(लेखक इतिहासाचे अभ्यासक असून आय.एल.एस महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण घेत आहेत).

संदर्भ –
1) असा हा गोमंतक – माधव गडकरी
2) भारतीय संस्कृतीकोष खंड -९
3) गोमंतक प्रकृती आणि संस्कृती खंड – २
इतर महत्वाचे –

मातृदेवता सटवाई उर्फ षष्ठी! | नवरात्र विशेष #१

जैन देवता पद्मावती | नवरात्र विशेष #२

जखिण उर्फ यक्षिणी | नवरात्र विशेष #३

कोल्हापुरच्या श्रीमहालक्ष्मी च्या स्थापनेचा इतिहास | नवरात्र विशेष #४