महाविकास आघाडीला दरेकरांचा इशारा : पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील पेनड्राईव येणार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सहकार मंत्र्यांच्या जिल्ह्यात येवून सहकाराची माहिती घेत आहे. गेले दोन दिवस मी, गोपीचंद पडळकर आणि आणखी तीन- चार आमदार फिरत आहेत. विरोधी पक्षनेता म्हणून गुप्त पद्धतीने काम करताना पश्चिम महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यात बरेच काही हाती लागले असून योग्यवेळी पेनड्राईव येईल, असा इशारा महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.

सातारा येथे आज दि. 17 रोजी सेशन कोर्टाने दिलासा दिल्यानंतर पत्रकार परिषदेत प्रवीण दरेकर बोलत होते. यावेळी आ. गोपीचंद पडळकर, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रवीण दरेकर म्हणाले, माझ्याकडे मंजूर संस्थेचे सभासदत्व बोगस मग अशावेळी साताऱ्यात किती सहकारी संस्था आहेत, त्यांचा जरा लेखाजोखा बघायला आलो आहे. सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात आम्हाला पण विरोधी पक्षनेता म्हणून काही गुप्त पद्धतीने काम करावं लागतं. मी जरा दोन दिवस त्याच्या मध्येच होतो. साताऱ्यात सहकारी संस्था, सहकार मंत्र्यांच्या जिल्ह्यातले सभासद सगळे किती खरे, किती खोटी आहेत हे माहिती गोळा करणे सुरू आहे. सांगली जिल्हा बँकेत दोन दिवस टीव्हीवर चालले आहे, कुणाकुणाला एक कोटी, दीड कोटी, दोन कोटी खिरापती वाटलेल्या आहेत.

काँग्रेस, राष्ट्रवादीचे 90 टक्के बोगस सभासद

पश्चिम महाराष्ट्रात फिरताना खूप काही हाताला लागले आहे. याचं कारण या ठिकाणी 90 टक्के राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे बोगस सभासद आहे. बोगस पद्धतीने कर्ज घेतात, त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज घेतात. शेतकऱ्याला नावावर साखर कारखानदार उचल घेतात, शेतकऱ्यांना डायरेक्ट कर्जदार करतात अशा अनेक गोष्टी आहेत. त्या गोष्टींचा मी दोन दिवस झाले, आपण म्हणता तसा खरं तर अंदाज घेतोय, अभ्यास करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात फिरतो आहे. आणि शांतपणे फिरतोय नाही, त्यांचा पेनड्राईव योग्य वेळी येईल.

सातारा, सांगली आणि कोल्हापूर टार्गेट

सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सहकारी संस्था किती स्वच्छ आहेत, त्या पाहण्याचं आमचं नियोजनच आहे. सगळ्या तालुक्यात, जिल्ह्यात जिल्हा सहकारी बँका काय करतायंत, सहकारी संस्था, त्यांचे कारखाने काय करत आहेत, त्यांच्या सूतगिरण्या काय करतायंत, त्यांच्या पणन संस्था काय करताय, एपीएमसीत कशा प्रकारे घोटाळे आहेत, हे पहायला आता मला वेळ आहे. आता तुम्ही आमच्यावर अटॅक केलेला आहे. आम्ही संघर्ष करणारे लोक आहोत, पडळकर एका दिशेने फिरत आहेत. मी एका दिशेने फिरत आहे, आमचे आणखी दोन-तीन आमदार फिरतायत आणि या सम्राटांच्या माहिती गोळा करत आहोत. आमच्या सारखा कार्यकर्ता मजुरी करून मोठा झाला तर गुन्हा आहे का? पोलादपूर मध्ये तिकडे रोजगार हमीवर मी काम केले. आमच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करणार, तेव्हा आता बघूया तुम्ही किती धुतल्या तांदळासारखे आहात.