निव्वळ वेडेपणा…विकेंड लॉकडाऊन कसा असतो रे बाबा?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : शहरात लॉकडाऊन लागले असला तरीदेखील काहीजण चक्क विकेंड लॉकडाऊन कसा असतो हे पाहण्यासाठी अनेकजण घराबाहेर फेरफटका मारताना दिसून आले. कोरोनामुळे वर्षभरात बरेच लॉकडाऊन लागले. असे असतानाही आता पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्याने शहरात अंशतः आणि शनिवार, रविवारी पूर्णतः लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. काहीजण लॉकडाऊनमध्ये कोणी फिरत आहे का, ते पाहण्यासाठी घराबाहेर पडत आहे.

आधीच औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा प्रतिदिन वाढत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा हा ६४ हजार २४३ वर गेला आहे. अशा परिस्थितीत दुसरीकडे प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शनिवारी आणि रविवारी पूर्णतः लॉकडाऊन आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद आहे. मात्र काही जणांना याचे गांभीर्य नसल्याचे लक्षात येते.

घरातच बसावे; प्रशासनाने केले आवाहन

शनिवार आणि रविवारी पूर्णतः लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे घरातच बसावे आणि सुरक्षित राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. असे असताना काहीजण उगाचच फेरफटका मारताना आढळून आले. अशा व्यक्तींवर काही ठिकाणी कारवाई देखील केली जात आहे. काही जणांनी कारवाई होत असल्याचे दिसताच धूम ठोकली असल्याचेही दिसून आले.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment