फुल्ल बाजारात पोलिसांचा फाैजफाटा येताच लोकांची पळापळ

पाटण शहरात आठवडा बाजारात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

शासनाच्या जमावबंदीचे आदेश डावलून पाटणला आठवडा बाजार फुल्ल भरला होता. सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पायदळी तुडविले गेले असल्याची माहिती पोलिसांना मिळताच फाैजफाटा घेवून बाजारात येताच लोकांची पळापळ सुरू झाली.

बाजारात पोलिस उपअधीक्षक अशोक थोरात, पोलिस निरीक्षक एन. आर. चौखंडे आणि नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी यांना लोकांना बाजारातून हटविण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले. पोलिसांनी सर्वांना आठवड्या बाजारात आलेल्यांना अक्षरक्ष: हाकलून वण्याचे काम करावे लागले.

कोरोनाचा कहर वाढत असताना कोणालाही त्याचे गांभीर्य नाही, हे भयानक चित्र पाटणच्या बाजारपेठेत पहावयास मिळाले. दोन दिवसांपूर्वी प्रशासनाने धडक मोहीम राबवून मोकाट फिरणाऱ्यांचे जुन्या बस स्थानक परिसरात कोरोना स्वॅब नमुने घेतले. त्या वेळी सर्वांची पळापळ झाली होती. त्याचाही काहीही परिणाम लोकांवर झालेला नाही, हे समोर आले.

सकाळपासून रामापूर ते केरापूल दरम्यान कऱ्हाड- चिपळूण महामार्गावर व भाजीमंडईत व्यापाऱ्यांनी व आसपासच्या शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची दुकाने थाटली. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास तर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जाच उडालेला दिसला. महामार्ग, भाजीमंडई व पाटणच्या मुख्य बाजारपेठेत मोठी गर्दी उसळली. नेहमीप्रमाणे आठवडी बाजार भरला असे चित्र दिसत होते. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पोलिस उपअधीक्षक अशोक थोरात, पोलिस निरीक्षक एन. आर. चौखंडे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी चाफोली रस्त्यापासून पोलिस फौजफाटा घेऊन रस्त्यावर उतरले. व्यापारी व जनतेला संपूर्ण बाजार बंद करा व घरी जा, असे आवाहन करू लागले. काही जणांना पोलिसांनी कायदेशीर बडगा दाखवण्याचा प्रयत्नही केला.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like