Wednesday, June 7, 2023

किडक्या डोक्याच्या लोकांनी चुकीची स्क्रीप्ट शाहू महाराजांना दिली : देवेंद्र फडणवीस

नागपूर | कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या गादीचा एक मोठा मान आहे. त्यांनी कुठलेही मत व्यक्त केले असले तरी मी काही बोलणार नाही. त्यानंतर छ. संभाजीराजे यांनी ट्विटद्वारे दिलेली प्रतिक्रीया ही बोलकी आहे. मला एका गोष्टीचे दुः ख आहे. काही किडक्या डोक्याच्या लोकांनी स्क्रीप्ट तयार करून आदरणीय महाराजांना चुकीची माहिती दिली. त्या लोकांना समजत नाही, अशी माहीती देवून ते संभाजी महाराजांना खोट ठरवतायत. दुसरीकडे महाराज आणि युवराज यांच्यामध्ये अंतर असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करतायतं, असा आरोप विरोधी पक्षनेते व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांचे नांव न घेता केला.

नागपूर येथे देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, छ. संभाजीराजे याचे नेतृत्व गेल्या 6 वर्षात चांगल्या प्रकारे तयार होत होते. मराठा, बहुजन समाजाबद्दल त्याच्या बद्दल आपुलकी तयार झाली आहे. अशा प्रकारचे पश्चिम महाराष्ट्रात नेतृत्व तयार होत असल्याने भाजपाला नुकसान होत नव्हते. त्यामुळे याचे नुकसान कोणाला होणार, हे मी सांगण्याची गरज नाही. ज्यांना राजकारण कळतं त्यांना माहिती आहे.

छ. संभाजीराजेंना भाजप पाठिंब्याबाबत वरिष्ठांशी चर्चा करणार होते

आभार मानण्याकरिता मला युवराज छ. संभाजीराजे भेटले होते. मी कुठल्याही पक्षाचे तिकीट घेणार नाही, मी स्वतंत्र उभा राहणार आहे. आमच्या घराण्याची परंपरा पाहता, ज्या प्रकारे मागच्यावेळी भाजपाने राष्ट्रपती कोट्यातून भाजपाने पाठिंबा दिला होता. आता मला सर्व पक्षांनी अपक्ष म्हणून समर्थन द्यावे. आमच्या पक्षाचा निर्णय माझ्या हातात नसतं. त्यामुळे मी वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय सांगेन असे सांगितले होते. काही माणसं ज्या प्रकारचे राजकारण करतायतं ते उघडे पडतील, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.