ऑनलाईन गाडी खरेदी व्यवहारात एकाला लाखांचा गंडा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

ओएलएक्स ॲपवर चारचाकी स्कॉर्पिओ गाडी खरेदी व्यवहारात एकाला लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फोनवर ठरलेल्या व्यवहारात १ लाख १२ हजाराची फसगत केल्याची तक्रारकराड तालुका पोलिसांत दाखल झाली आहे.अनिल संभाजी जगताप (वय ४०, रा. वडगांव हवेली, ता.कराड) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सैन्यदलातील अनिल जगताप यांनी ओएलएक्स या मोबाईल ॲपवरून चारचाकी महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी क्रमांक ( डीएल १० सीटी – ०७७०) या गाडीची माहिती मिळविली होती. त्या गाडीचा मालक पवन कुमार पांडे (रा. नवी दिल्ली) असे ॲपवर असल्याने त्याच्याशी मोबाईल क्रमाकांवर संपर्क साधून गाडीचा व्यवहार ठरला होता. व्यवहार ठरत असताना पवन पांडे यांने गाडीची कागदपत्रे अनिल जगताप यांना व्हाटसअपला पाठविली होती.

यानंतर दोघांमध्ये मोलभाव ठरत गाडीचा व्यवहार २ लाख ३० हजार रूपयांना ठरला होता. त्यातील १ लाख १२ हजार १२० रूपये दिनांक १४ जून २०१९ रोजी अनिल जगताप यांनी गाडीमालकांस स्टेट बँकेच्या खात्यात पाठविले होते. गाडीची बाकीची रक्कम १ लाख १७ हजार ८८० रूपये गाडी मिळाल्यानंतर देण्याचे दोघांमध्ये ठरले होते. मात्र त्यादिवसापासून जगताप यांना ना त्यांची ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे गाडी मिळाली ना त्यांना त्यांचे दिलेले पैसे मिळाले. गाडी मालक पांडे यांच्याशी वारंवार संपर्क करून सुद्धा त्याने गाडी पाठवून दिली नाही. तसेच पवन पांडे यांने फोन घेणं बंद केले. त्यामुळे अनिल जगताप यांनी पैसे घेवून फसवणूक केल्याची फिर्याद कराड तालुका पोलिसांत दिली आहे.

Leave a Comment