Saturday, March 25, 2023

पेट्रोल-डिझेल दरात पुन्हा एकदा घसरण; गाठला महिनाभराचा नीचांक

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र । मागील तीन ते चार दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचा किमतीतील घसरण कायम आहे. त्याच्या परिणाम देशातील पेट्रोल-डिझलच्या किंमतीवर पाहायला मिळाला आहे. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी शनिवारी इंधन दरात कपात केली आहे. देशभरात आज पेट्रोल सरासरी १७ पैसे आणि डिझेल १९ पैशांनी स्वस्त झाले. जागतिक बाजारात खनिज तेलाचा भाव (यूएस क्रूड) ६३ डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली आहे. या कपातीनंतर पेट्रोल-डिझेल दराचा चालू महिन्यातील नीचांकी स्तर आहे.

देशातील पेट्रोल-डिझेलचे दर

- Advertisement -

मागील काही दिवसांपासून इंधन दरात घसरण झाली आहे. शनिवारी मुंबईत पेट्रोल प्रति लीटर ८०.२५ रुपये आहे तर डिझेलचा दर ७१.१५ रुपये आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलसाठी ग्राहकांना ७४.६५ रुपये मोजावे लागत असून डिझेलचा दर ६७.८६ रुपये आहे. बंगळूरमध्ये आजचा पेट्रोलचा दर ७७.१५ रुपये आहे. डिझेल ७०.१२ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोल ७७.५४ रुपये आणि डिझेल ७०.१२ रुपये आहे. हौद्राबादमध्ये पेट्रोल ७९.३८ रुपये असून डिझेल ७३.९९ रुपये आहे.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ‘अयोध्या’वारीचा दिवस ठरला! या दिवशी करणार प्रयाण

मोदी मुस्लीमबहूल काश्मीरवर निर्बंध लादून हिंदूराष्ट्र निर्माण करत आहेत – उद्योगपती जॉर्ज सोरोस

तब्बल ५ महिन्यांनंतर जम्मू काश्मीरमध्ये २जी इंटरनेट सेवा सुरू; सोशल मीडियावर अजूनही बंदी