देशात इंधन दरवाढीचा आगडोंब; परभणीत पेट्रोलने गाठली ‘शंभरी’; ग्राहकांच्या खिशाला झळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । नजीकच्या काळात देशात महागाईचा आगडोंब उसळणार असल्याची चिन्ह दिसतायत. कारण सलग सातव्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरवाढ केलीय. पेट्रोलियम कंपन्यांनी केलेल्या आजच्या इंधन दरवाढीनंतर राज्याच्या परभणी शहरात पेट्रोल दराने शतक पूर्ण केलं आहे. परभणीत १ लिटर पेट्रोल आता १०० रुपयांना झालं आहे. या इंधन दरवाढीवरून केंद्रातील मोदी सरकारवर चौफेर टीका होत आहे.

आज पेट्रोलियम कंपन्यांनी सलग सातव्या दिवशी देशभरात पेट्रोल २९ पैसे तर डिझेल ३२ पैशानी दर वाढवले. आजच्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचा भाव ९५.४६ रुपये झाला आहे. मुंबईत एक लीटर डिझेलसाठी ग्राहकांना आता ८६.३४ रुपये मोजावे लागतील. तर राज्यातील परभणीमध्ये पॉवर पेट्रोलचा भाव १००.१६ रुपये झाला आहे. तर साध पेट्रोल सर्वाधिक ९७.४५ रुपये आहे. परभणीत १ लिटर डिझेलचा भाव ८६.९५ रुपये आहे.

दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ८८.९९ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ७९.३५ रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९१.१९ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८४.४४ रुपये भाव आहे. कोलकात्यात आज पेट्रोल ९०.२५ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ८२.९४ रुपये झाला आहे.बंगळुरात पेट्रोल ९१.९७ रुपये असून डिझेल ८४.१२ रुपये झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

Leave a Comment