Monday, February 6, 2023

वाढत्या पेट्रोल, डिझेलच्या किंमती कमी करण्यासाठी RBI गव्हर्नरांचा मोदी सरकारला सल्ला, म्हणाले..

- Advertisement -

नवी दिल्ली । देशात इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे नागरिकांवर आर्थिक ताण वाढत आहे. इंधन दरवाढीमुळे महागाई वाढत चालली असताना आता भारतीय रिझर्व बँकेने (Reserve Bank of India) केंद्रातील मोदी सरकारला सल्ला दिला आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी कर घटवून किंमती ताब्यात ठेवाव्यात असा केंद्रातील मोदी सरकारला सल्ला दिला आहे.

आरबीआयने नुकत्याच झालेल्या एमपीसी बैठकीत दास यांनी केंद्र आणि राज्य सरकारांनी अप्रत्यक्ष कर कमी करण्याचे आवाहन केले आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी केल्या जाव्यात. जेणेकरून याचा दिलासा सामान्यांना मिळेल. इंधनावरील कर हळूहळू कमी करणे गरजेचे आहे. यामुळे अर्थव्यवस्थेवर बनत चाललेला वाढत्या किंमतींचा दबाव हटेल, असे दास म्हणाले.

- Advertisement -

MPC मिनट्समध्ये सांगण्यात आले की, डिसेंबरमध्ये सीपीआय म्हणजे ठोक महागाई दर हा खाद्य आणि इंधन हटविल्यानंतरही 5.5 टक्क्यांवर राहिला आहे. कच्च्या तेलाच्या वाढच्या किंमती आणि पेट्रोल, डिझेलवर मोठमोठे कर लावल्याने आता बाजारातील मालाच्या किंमतीही वाढत चालल्या आहेत. यामुळे महागाई वाढत आहे. यामध्ये वाहतूक आणि आरोग्य सेवादेखील महाग होत चालल्या आहेत.

दरम्यान, तेल कंपन्यांकडून दररोज पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जारी केले जातात. त्यानुसार मागील १२ दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. मंगळवारी दिल्लीत पेट्रोलची किंमत ९०.९३ वर पोहोचली आहे. मुंबईतील पेट्रोलची किंमत प्रतिलिटर ९७.३४ रुपये आहे. तर राजस्थानमधील श्रीगंगानगर, हनुमागड ते मध्यप्रदेशातील अनेक शहरांमध्ये किरकोळ पेट्रोलचे दर प्रति लिटर १०० रुपयांच्यावर गेले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.