100 रुपयांच्या पेट्रोलवर 53 रुपयांपर्यंत TAX! जाणून घ्या नक्की प्रकरण काय आहे?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतच आहेत. त्याबाबत केंद्र आणि राज्य सरकारे आता एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. नुकतेच काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासह काही राज्यांना पेट्रोल डिझेलवरील कर कमी करून इंधन दरवाढ कमी करण्याचं आवाहन केलं. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांच्या आवाहनाला केंद्र अन राज्याची कर आकडेवारी जाहीर करून इंधन दर वाढीला राज्य सरकार जबाबदार नसल्याचं सांगितलं. पण यामुळे सामान्य माणसाला नक्की पेट्रोलची मूळ किंमत किती असते? अन त्यावर कर किती लावला जातो असा प्रश्न पडला आहे. यावरच आज आम्ही तुम्हाला इथे माहिती देणार आहोत. petrol price today

केंद्र आणि राज्य सरकारमधील वाद हा पेट्रोल आणि डिझेलच्या कींमतींद्वारे मिळणाऱ्या मोठ्या महसूलामुळे सुरु आहे. केंद्र किंवा राज्य दोघांनाही आपली कमाई सोडायची नाही. हेच कारण आहे की, अनेक राज्यांमध्ये 100 रुपयांच्या पेट्रोलमध्ये 53 रुपयांचा वाटा केंद्रीय आणि राज्य टॅक्स जोडून बनवला जातो. मात्र, यात थोडीशी जरी प्रमाणात कपात केली गेली तरीही जनतेला पेट्रोल 70-80 रुपये प्रतिलिटर मिळू शकेल. मात्र यामागील सुरु असलेल्या राजकारणामुळे हे शक्य होत नाहीये.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या सद्य परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली अशी माहिती शिवसेना खासदार असलेले संजय राऊत यांनी दिली. याबैठकीमध्ये त्यांनी पेट्रोल आणि डिझेलबाबत विशेषत: बिगर-भाजप शासित राज्यांना दोष देण्यास सुरुवात केली. पंतप्रधानांकडून हे अपेक्षित नव्हते.असे संजय राऊत म्हणाले. याबाबतीत सर्व बिगर भाजप मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांवर टीका केली आहे.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी सांगितले की, ‘ नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 5 रुपयांनी कपात केली होती. मात्र निवडणुका संपताच त्यांचे भाव पुन्हा वाढवण्यात आले. त्यामुळे हे दर नक्की कोण वाढवतंय आणि कोण कमी करतंय हे लोकांना कळलं.” तसेच तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखरराव देखील म्हणाले कि, ”राज्यांना कर कमी करण्याचे आवाहन करताना पंतप्रधानांना लाज वाटली पाहिजे. केंद्र स्वतःचा टॅक्स कमी का करत नाही.” त्याचवेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या कि, ”पंतप्रधानांनी एकतर्फी भाषण केले. बैठकीत त्यांनी सांगितलेली तथ्ये अर्धवट होती.”

राज्यांकडून मिळालेल्या तिखट प्रतिक्रियांनंतर केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी गुरुवारी, 28 एप्रिल रोजी सकाळी एक रिट्विट करताना म्हटले कि, ‘महाराष्ट्र सरकार पेट्रोलवर प्रति लिटर 32.15 रुपये टॅक्स आकारते. त्याचप्रमाणे राजस्थानमध्ये 29.10 रुपये प्रति लिटरपर्यंत टॅक्स आकारला जातो. तर भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या उत्तराखंडमध्ये 14.51 रुपये प्रति लीटर तर उत्तर प्रदेशात 16.50 रुपये प्रति लिटर टॅक्स आकारण्यात येत असल्यानं जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.’

कोरोनाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की,” गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये केंद्राने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्याच वेळी, राज्यांना मूल्यवर्धित कर (VAT) कमी करण्यास सांगितले गेले होते. मात्र महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ, झारखंड, तामिळनाडू ही राज्ये तसे करण्यास तयार नव्हते.”

हे पण महत्वाचे –

WhatsApp युजर्ससाठी आनंदाची बातमी! WhatsApp वापरा आणि पैसे कमवा! जाणून घ्या कसे मिळणार पैसे

PM Svanidhi Yojana : आता गॅरेंटी शिवाय मिळेल 50 हजारांपर्यंतचे कर्ज; मुदत 2024 पर्यंत वाढली

पंतप्रधान मोदींच्या आरोपावर मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर; पेट्रोल-डिझेलची आकडेवारीने देऊन केली पोलखोल..

Leave a Comment

हिना खानचे नवीन फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल. हिना खानची कातिलाना अदा पहाच …. . हिना खानचा हॉट अंदाज पहा ….. हिना खानचा गुलबी साडी मध्ये लेटेस्ट लूक. स्ट्रॉबेरी फळाचे आरोग्यवर्धक फायदे; पहा…