Wednesday, March 29, 2023

Petrol Diesel Price: पुढील आठवड्यापासून भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात होऊ शकेल वाढ

- Advertisement -

नवी दिल्ली । पुढील आठवड्यापासून भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होऊ शकेल. युक्रेन-रशिया युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमती गेल्या सात वर्षांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचल्या आहेत. ज्याचा परिणाम येत्या आठवडाभरात भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवरही दिसू शकेल. ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गनच्या म्हणण्यानुसार, पुढील आठवड्यात पाच राज्यांतील निवडणुका संपल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाच्या दराने प्रति बॅरल 110 डॉलरची पातळी ओलांडली आहे.

जेपी मॉर्गनने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, पुढील आठवड्यापासून रिटेल डिझेल आणि पेट्रोलच्या किंमतीत वाढ होण्याची अपेक्षा आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांमुळे, पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही दैनंदिन इंधनाच्या दरात होणारी वाढ पुन्हा सुरू होईल अशी आमची अपेक्षा आहे.

- Advertisement -

पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार ?
विशेष म्हणजे नोव्हेंबरपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. जेपी मॉर्गनच्या मते, ऑइल मार्केटिंग कंपन्याना (OMCs) 5.70 रुपये प्रति लीटर v/s सामान्य मार्जिन रु.2.5/लीटर नुकसान होते आहे. आम्ही गुंतवणूकदारांना सावध करतो की, कच्चे तेल, डिझेल आणि परकीय चलनातील अस्थिरता पाहता ते दिवसेंदिवस बदलू शकते.

कच्च्या तेलाच्या किंमती 111 डॉलर प्रति बॅरल च्या पुढे
बुधवारी दुपारपर्यंत ब्रेंट क्रूडच्या किंमती मागील बंदच्या तुलनेत 6.59% ने प्रति बॅरल $111.56 वर होत्या. ब्रेंट सध्या 2014 नंतरच्या सर्वोच्च पातळीवर आहे. मंगळवारी त्याची किंमत प्रति बॅरल 102.16 डॉलर होती. त्यात सातत्याने वाढ होत आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) इंधन विक्रेते पेट्रोलवर प्रति लिटर ₹ 5.7 नुकसान करत आहेत.

रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या दरांवर होणार का?
2014 च्या मध्यानंतर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती US$ 110 प्रति बॅरलच्या वर पोहोचल्या. अशी भीती आहे की, युक्रेनमधील संघर्ष किंवा पाश्चात्य निर्बंधांमुळे दिग्गज ऊर्जा कंपन्यांना रशियाकडून मिळणार ऑइल आणि गॅसचा पुरवठा खंडित होऊ शकतो.

ऑईल मंत्रालयाचे काय म्हणणे आहे ?
ऑईल मंत्रालयाच्या पेट्रोलियम प्लॅनिंग अँड एनालिसिस सेल (PPAC) कडून मिळालेल्या माहितीनुसार, 1 मार्च रोजी, भारताची कच्च्या तेलाची खरेदी प्रति बॅरल $ 102 च्या वर पोहोचली, जी ऑगस्ट 2014 नंतरची सर्वाधिक आहे. उत्तर प्रदेश विधानसभेसाठी मतदानाचा सातवा आणि शेवटचा टप्पा 7 फेब्रुवारीला असून 10 मार्चला मतमोजणी होणार आहे.

ब्रोकरेजने सांगितले की, ऑइल मार्केटिंग कंपन्यांना सामान्य मार्केटिंग मार्जिनवर परत जाण्यासाठी रिटेल किंमती प्रति लिटर 9 रुपये किंवा 10 टक्क्यांनी वाढवणे आवश्यक आहे. सध्या दिल्लीत पेट्रोलचा दर 95.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 86.67 रुपये आहे. राज्य सरकारने उत्पादन शुल्कात कपात आणि व्हॅट दरात कपात केल्यानंतर ही किंमत आहे.