Petrol Price Today : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींपासून आज दिलासा, टाकी भरण्यासाठी किती पैसे मोजावे लागणार ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली |  वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या दरम्यान सर्वसामान्यांना आज थोडा दिलासा मिळाला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ केलेली नाही. काल आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये थोडा दिलासा मिळाला आहे, त्यामुळे आज इंधनाचे दर वाढलेले नाहीत. गेल्या दीड महिन्यांपासून सलग वाढ झाल्यानंतर आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती विक्रमी पातळीवर आहेत. याशिवाय देशातील अनेक शहरांमध्ये किंमती 105 रुपयांच्या पुढे गेली आहेत.

मे महिन्यापासून पेट्रोलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या 26 दिवसांत पेट्रोल 6.34 रुपयांनी महागले आहे. त्याशिवाय गेल्या 26 दिवसांत डिझेलच्या दरातही 6.63 रुपयांची वाढ झाली आहे.

आज बैठक होणार आहे
आज वाढत्या तेलाच्या किंमतींसंदर्भात संसदेच्या स्थायी समितीची एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. ही बैठक पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूविषयक स्थायी समिती घेणार आहे. या समितीने पेट्रोलियम मंत्रालय आणि IOC, BPCL आणि HPCL च्या अधिकाऱ्यांना बोलावले आहे. बैठकीत सद्यस्थितीतील किंमती आणि मार्केटिंग या विषयावर माहिती मागविली जाईल. नैसर्गिक वायूच्या सध्याच्या किंमती-मार्केटिंग विषयावर माहिती देखील मागितली जाईल. यासह GAIL च्या अधिकाऱ्यांनाही बैठकीत बोलविण्यात आले आहे.

आपल्या शहरात पेट्रोल डिझेल कितीला विकले जात आहे ते पहा
>> दिल्लीत पेट्रोल 96.66 रुपये तर डिझेल प्रति लिटर 87.41 रुपये आहे.
>> मुंबईत पेट्रोल 102.85 रुपये तर डिझेल प्रति लिटर 94.84 रुपये आहे.
>> चेन्नईमध्ये पेट्रोल 97.91 रुपये तर डिझेल 91.92 रुपये प्रति लिटर आहे.
>> कोलकातामध्ये पेट्रोल 96.58 रुपये आणि डिझेल 92.04 रुपये प्रति लिटर आहे.

या शहरांमधील पेट्रोल 105 रुपयांच्या पुढे गेले

>> राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल 107.79 रुपये तर डिझेल 100.51 रुपये प्रति लिटर आहे.

>> मध्य प्रदेशातील अनुपनगरमध्ये पेट्रोल 107.43 रुपये आणि डिझेल 98.43 रुपये प्रति लिटर आहे.

>> रीवा मधील पेट्रोल 107.07 रुपये आणि डिझेल 98.10 रुपये प्रति लिटर आहे.

>> भोपाळमध्ये पेट्रोल 104.85 रुपये तर डिझेल 96.05 रुपये प्रति लिटर आहे.

>> परभणीत पेट्रोल 105.16 रुपये तर डिझेल 95.63 रुपये प्रति लिटर आहे.

दररोज 6 वाजता किंमत बदलते

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू आहेत. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत यावर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

पेट्रोल डिझेलचे दर याप्रमाणे तपासा
आता आपण एसएमएसद्वारे देखल पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अपडेट केले जातात. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला RSP सह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाइटवरून पाहू शकता. त्याच वेळी, आपण BPCL कस्टमर असाल तर RSP लिहून 9223112222 वर आणि एचपीसीएल कस्टमर HPPrice असे लिहून 9222201122 एसएमएस पाठवून आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत जाणून घेऊ शकता.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment