म्हणून पेट्रोलचे दर वाढले ; खुद्द पेट्रोलियम मंत्र्यानीच सांगितलं खरं कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात पेट्रोल आणि डिझेलच्या प्रचंड दरवाढी मुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असून केंद्रातील मोदी सरकार टीकेचा निशाणा बनल आहे. बर्‍याच शहरांमध्ये पेट्रोल प्रतिलिटर 100 रुपये दराने विकले जात आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी वाढत्या किमतीवर भाष्य केलंय.

धर्मेंद्र प्रधान म्हणाले, तेल उत्पादक देशांनी उत्पादन कमी केले आहे. यामुळे तेल आयात करणाऱ्या देशांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. भारत आपल्या गरजेच्या 80 टक्के तेल आयात करतो. भारत कच्च्या तेलाच्या आयातीत जगातील तिसरा मोठा देश आहे.

आम्ही OPEC & OPEC plus (तेल उत्पादक देश) यांच्याशी सतत संपर्कात आहोत. आम्ही त्यांना आवाहन करीत आहोत की, किमती वाढवू नये. येत्या काळात यात बदल होणार आहे. प्रधान म्हणाले, कोरोनामुळे सरकारचे बजेट लक्षणीय वाढले आहे. आर्थिक सुधारणांना गती देण्यासाठी सरकारने गुंतवणुकीत वाढ केली असून, याशिवाय भांडवली निधीतही 34 टक्के वाढ केलीय. सरकारला खर्च करण्यासाठी पैशांची गरज आहे आणि म्हणूनच ते कर वसूल करतात. केंद्र आणि राज्य दोन्ही पेट्रोल डिझेलवर कर आकारतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment