सातारा प्रतिनिधी। सकलेन मुलाणी
भाडळी, ता. फलटण येथे सर्जेराव दादा माने यांच्या मालकीच्या इमारतीमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्डयावर फलटण ग्रामीण पोलिसांनी शनिवार, दि 5 रोजी छापा टाकला. या छापेमारीत सुमारे 4 लाख 37 हजार 940 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत ग्रामीण पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार, दि. 5 फेब्रुवारी रोजी सुनील मोतीराम पवार {वय 40, रा. बुधवार पेठ, फलटण), जमन तारो पंडित (वय 32, रा. येरवडा सादलबाबा दर्गा जवळ पुणे), योगेश यशवंत खरात (वय 34, रा. पंणदरे, ता. बारामती) आतिश सुभाष साळवे (वय 24, रा. पंणदरे, ता. बारामती), सोमनाथ सिताराम घनवट (वय 39, रा. जाधववाडी, ता. फलटण) जांन्टी (रा. पंणदरे, ता. बारामती), माऊली भिवरकर (रा. फलटण), सनी काकडे (रा. फलटण), सर्जेराव दादा माने (रा. भाडळी, ता. फलटण) हे तीनपानी पत्त्याचा जुगार पैजेवर पैसे लावून खेळत होते.
याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी छापा टाकला. यामध्ये एकूण एकूण 4 लाख 37 हजार 940 रुपयांचा मुद्देमाल आणि जुगाराचे साहित्य मिळून आले. यानंतर संबंधित आरोपींचा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबतची पोलिसात गणेश अवघडे यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आरगडे करत आहेत.