Wednesday, February 1, 2023

फलटण पोलिसांकडून अडीच किलो गांजा जप्त

- Advertisement -

फलटण | फलटण शहर पोलीसांनी बेकायदेशीर अंमली पदार्थ गांजावर धडक कारवाई केली आहे. यामध्ये सुमारे 2 किलो 592 ग्रॅम वजनाचा 10 हजार 800 रुपयांचा माल जप्त केला आहे. याबाबत फलटण शहर पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवार दिनांक 20 ऑक्टोंबर सायंकाळी फलटण शहर पोलीसांना गोपनिय माहिती मिळाली की, फलटण शहरामध्ये पाचबत्ती चौक फलटण या ठिकाणी दस्तगीर महम्मद शेख त्यांची पत्नी आयशा दस्तगीर शेख असे गांजा विक्री करत आहेत. अशी खात्रीशीर माहती मिळाली होती, त्यांनी त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या अधिपत्याखालील असणारे अधिकारी कर्मचारी यांचे पथक तयार करून मिळालेल्या माहितीचा आशय समजावून सांगुन छापा टाकण्यासाठी नायब तहसिलदार श्रीमती संजीवनी सावंत सरकारी पंच, वजनमापे करणारे, फोटोग्राफर यांच्या सह मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी पाचबत्ती चौक फलटण येथे दस्तगीर महम्मद शेख याच्या राहत्या घरी जावून छापा कारवाई केली. यावेळी संशयित दस्तगीर महम्मद शेख त्याची पत्नी आयशा दस्तगीर शेख यांचे कब्जात 2 किलो 592 ग्रॅम वजनाचा 20 हजार 800 रुपयाचा गांजा हा मिळुन आला. त्याप्रमाणे सविस्तर पंचनामा करून तो पंचासमक्ष जागीच सिलबंध करण्यात आला. फलटण शहर पोलीस ठाणे यांनी त्यांच्या विरुद्ध फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुरज शिंदे हे करीत आहेत.

- Advertisement -

सदरची कारवाई अजयकुमार बन्सल पोलीस अधिक्षक सातारा, अजित बोराडे अप्पर पोलीस अधिक्षक, तानाजी बरडे उपविभागीय पोलीस अधिकारी, निलेश देशमुख उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नवनाथ गायकवाड, पो. ना. शरद तांबे, म.पो. शि. अनिता गाडेकर, मपोशि रुपाली कुंभार, पो. कॉ. बगले, पो. को. गणेश ठॉबरे, पो. हवा चंद्रकांत घापते, पो. ना. कर्पे, पो. हवा. माने, पो. ना. मदने यांनी केली आहे.