फलटणला सोन्याचे दागिने पाॅलिश करण्याच्या बहाण्याने चोरट्यांनी लांबविले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | फलटण येथे सोन्याचे दागिने पॉलिश करुन देण्याच्या बहाण्याने हातचलाखीने 2 तोळ्याचा नेकलेस आणि 2 तोळ्याचे गंठण असे 4 तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लांबविले. याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात साै. विद्या शशिकांत चतुरे (वय 32, रा. सोनवडी बुद्रुक ता. फलटण) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी, विद्या चतुरे यांनी त्यांच्या घराच्या गेटसमोर दोन अनोळखी व्यक्ती मोटरसायकलवर आले होते. त्यांनी उजाला नावाची पावडर दाखवून देवाचा तांब्या, एक वाटी घासून दिली. त्यानंतर सोन्या- चांदीचे दागीने धुऊन देतो, असे सांगितले. तेव्हा विद्या चतुरे यांनी स्वत:च्या गळ्यातील मिनीगंठण व सासूबाईंच्या गळ्यातील मिनीगंठण वाटीत टाकले. घरातील सर्व दागिनेही दिले. त्या व्यक्तींनी एका प्लास्टीकच्या पिशवीतील लिक्वीड वाटीत टाकून दागिने वाटीत बुडवून बाहेर काढले. आता हे दागिने थोडा वेळ सुकू द्या, असे सांगितले.

त्यानंतर त्या व्यक्तीने कुकर व हळद घरातून आणण्यास सांगितले. कुकरमध्ये अर्धा कुकर पाणी घ्यायला सांगितले. त्यामध्ये चार – पाच चमचे हळद टाकून कुकरमधील पाणी गरम करायला सांगून सर्व दागिने कुकरमध्ये टाकले. त्यानंतर कुकरमधील एक- एक दागिना काढून रुमालाने पुसून पुन्हा कुकरमधील पाण्यात बुडवून त्याने सर्व दागिने चार – पाच वेळा पाण्यात बुडवून रुमालाने पुसले. त्यानंतर त्याने कुकर झाकून ठेवा व 10 मिनीटानंतर उघडा, असे म्हणून तो घरातून निघून गेला. दोन्ही व्यक्ती यावेळी घरातून बाहेर गेले आणि मोटरसायकलवर बसून पसार झाले. त्यामुळे फिर्यादी महिलेला शंका आल्याने तिने लगेच कुकरमधील पाण्यात हात घालून पाहिले असता, त्यात दागिने आढळले नाहीत. या महिलेने तिच्या सासूला ही घटना सांगितली. फिर्यादी महिलेचे 2 तोळ्याचा नेकलेस व 2 तोळ्याचे गंठण असा 4 तोळ्याचा 1 लाख 80 हजार रुपयांचे दागिने अज्ञात व्यक्तींनी लंपास केले.

Leave a Comment