फोन टॅपिंग मोदींच्या नव्हे तर मनमोहन सिंगांच्या काळात; फडणवीसांचा पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इस्त्रायलच्या पेगासस सॉफ्टवेअरचा वापर करुन भारतातील पत्रकार, राजकीय नेत्यांवर पाळत ठेवण्यात येत होती, असा दावा ‘द वायर’सह जगभरातील १५ मीडिया संस्थांनी केला आहे. यावरुन देशातील राजकीय वातावरण तापलं असून याचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटू लागले आहेत. मात्र भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पेगॅसससंदर्भातले सर्व आरोप फेटाळून लावले असून फोन टॅपिंग मोदींच्या नव्हे तर मनमोहन सिंग यांच्याच काळात झाल्याचा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला.

तत्कालीन मनमोहन सिंग यांच सरकार फोन टॅपिंग करतंय असाही आरोप झाला होता. तेव्हा फोन टॅप आम्ही नव्हे तर एका खासगी एजन्सीने फोन टॅपिंग केले आहेत, असं सांगितल होतं. जे काम झालंय ते लिगली झालंय असही त्यांनी सांगितलं होतं अस फडणवीस म्हणाले. राष्ट्रीय सुरक्षा, टॅक्स चोरी आणि मनी लॅान्ड्रिग रोखण्यासाठी हे फोन टॅप झाल्याच सांगितलं. UPA च्या काळात एकदा नाही तर अनेकदा फोन टॅपिंग झालं आणि ते कसं कायदेशीर रित्या योग्य आहे हे सांगितलं गेलं, असंही फडणवीस म्हणाले.

फडणवीस म्हणाले, संसंदेचं अधिवेशन डिरेल करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून केला जात आहे. काही मीडिया हाऊसेसनी Pagasus च्या बातम्या दाखवल्या, छापल्या. काहींनी एक यादीही दिली. पण त्या बातमीला कोणताही आधार नाही. भारत सरकारची कोणतीही एजन्सी अशा कोणत्याही पद्धतीचं हॅकिंग करत नाही.

You might also like