PIB Factcheck : पॅन नंबर अपडेट न केल्यास SBI YONO खाते बंद होणार, ‘या’ मेसेजमागील सत्यता तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PIB Factcheck : SBI च्या ग्राहकांसाठी ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. वास्तविक, सध्या सोशल मीडियावर एक बातमी खूप वेगाने व्हायरल होते आहे, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, आपला पॅन नंबर अपडेट न केल्यामुळे आपले SBI खाते बंद केले जाईल. जर आपल्याला असा एखादा मेसेज आला असेल तर ही बातमी खोटी आहे हे लक्षात ठेवा.

व्हायरल झालेल्या या मेसेजमध्ये असे स्पष्टपणे लिहिले आहे की, जर आपला आधार क्रमांक अपडेट केला नसेल तर YONO खाते बंद केले जाईल. यानंतर मेसेजमध्येच एक लिंकही देण्यात आली आहे, ज्याद्वारे अपडेट करण्यास सांगितले जात आहे.

व्हायरल मेसेजमागील सत्यता तपासा

PIB Factcheck ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट द्वारे सांगितले की, सध्या SBI च्या नावाने एक बनावट मेसेज ग्राहकांना त्यांचे खाते बंद होऊ नये म्हणून पॅन क्रमांक अपडेट करण्यास सांगत आहे. PIB Factcheck ने पुढे लिहिले कि, अशा प्रकारच्या ईमेल आणि एसएमएसला उत्तर देऊ नका आणि चुकूनही आपली वैयक्तिक माहिती आणि बँकेचे तपशील शेअर करू नका.

PIB Fact Check (@PIBFactCheck) / Twitter

बँकेकडून ग्राहकांना वेळोवेळी सावध केले जाते

हे लक्षात घ्या कि, जवळपास सर्वच बँका आपल्या ग्राहकांना ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करत असते. SBI ने देखील आपल्या ग्राहकांना बनावट व्हायरल मेसेजबाबत सावध करताना म्हंटले की, SBI कधीही कोणत्याही मेसेजद्वारे वैयक्तिक तपशील विचारत नाही. ऑनलाइन फसवणुकीच्या अनेक घटना आपण दररोज वाचतो आणि ऐकतो. त्यामुळे नेहमी सावध राहण्याची गरज आहे. मेसेज शेअर करणे आणि आपली वैयक्तिक माहिती न तपासता शेअर करणे टाळा. PIB Factcheck

The embarrassment that is PIB Fact Check: Who fact-checks this 'fact checker'?

अशा प्रकारे सत्यता तपासा

जर आपल्यालाही असा एखादा मेसेज आला तर आपण तो PIB कडे फॅक्ट चेकसाठी https://factcheck.pib.gov.in/ किंवा whatsapp क्रमांक +918799711259 किंवा ईमेल: [email protected] वर पाठवू शकता. ही माहिती PIB वेबसाइट https://pib.gov.in वर देखील उपलब्ध आहे.

हे पण वाचा :
Lava ने लॉन्च केला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन, किंमत अन् फीचर्स तपासा
‘या’ 5 बँका स्वस्त दरात देत आहेत Gold Loan, असे असतील व्याजदर
FD Rates : ‘या’ 4 बँका ज्येष्ठ नागरिकांना FD वर देत आहेत 8% पेक्षा जास्त व्याज !!!
PMSBY : अवघ्या 12 रुपयांत मिळवा 2 लाखांची सुविधा, जाणून घ्या कसे ???
Multibagger Stock : अवघ्या 17 दिवसांत ‘या’ VFX कंपनीने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस !!!