Tuesday, June 6, 2023

FactCheck : पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजनेंतर्गत सरकार देत आहे 5 लाख रुपये ?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की केंद्र सरकार शेतकऱ्यांना निम्म्या किंमतीला ट्रॅक्टर देत आहे? व्हायरल झालेल्या या वृत्तानुसार पीएम किसान ट्रॅक्टर योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांना निम्म्या दराने ट्रॅक्टर देत आहेत. या जाहिरातीनुसार सरकार प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजनेंतर्गत 5 लाख रुपये देत आहे. पीआयबी फॅक्ट चेक या भारत सरकारच्या अधिकृत ट्विटर हँडलने निम्म्या दराने ट्रॅक्टर देण्याची जाहिरात बनावट असल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकारची अशी कोणतीही योजना नाही आहे.

या पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजनेंतर्गत सरकार 5 लाख रुपये देत असल्याचा दावा या बनावट जाहिरातीमध्ये करण्यात आलेला आहे. जाहिरातीमध्ये पात्रता निकष व अर्जाची संपूर्ण माहितीसह या योजनेचा लाभ घेण्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र पीआयबी फॅक्ट चेकने त्याला बनावट जाहिरात म्हटले आहे.

 

केंद्र सरकार शेतीत युरियाच्या वापरावर बंदी आणणार आहे
काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल झाली होती की भारत सरकार आता शेतातील युरियाच्या वापरावर बंदी आणणार आहे. या दाव्याब्ररोबर वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तपत्राचे कटिंगही व्हायरल होत आहे. ‘आता सरकार शेतीत युरिया वापरणे बंद करेल’, वर्तमानपत्रामध्ये हे वृत्त प्रसिद्ध झाले. मात्र जेव्हा या बातमीच्या खरेपणाचा तपास केला गेला, तेव्हा इंटरनेटवर अशी कोणतीही बातमी आढळली नाही, ज्यामुळे भारत सरकार युरियाच्या वापरावर बंदी घालणार आहे याची पुष्टी होते.

पीआयबी फॅक्ट चेकने शेतीमध्ये यूरियावर बंदी आणणार असल्याचा हा दावा खोटा असल्याचे सांगताना ते म्हणाले, ‘हा दावा बनावट आहे! युरीयाचा शेतीत वापर करण्याबाबत भारत सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.

ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in