Monday, January 30, 2023

मित्रांच्या मदतीने प्रेयसीचे बनवले आक्षेपार्ह व्हिडिओ, ब्लॅकमेल करून सर्वांनी केले सामुहिक अत्याचार

- Advertisement -

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पिंपरी-चिंचवडमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये तरुणीचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्या प्रियकराने आणि त्याच्या मित्रांनी अत्याचार केले आहेत. हा प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु होता. आपली बदनामी होईल म्हणून या तरुणीने याची कुठेच वाच्यता केली नव्हती. मात्र अखेर त्यांच्या या त्रासाला कंटाळून तिने अखेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

काय आहे प्रकरण
पिंपरी चिंचपडमध्ये राहणाऱ्या एका तरुणीचे एका तरुणाबरोबर प्रेमसंबंध होते. त्यामुळे एकमेकांना भेटत देखील होते. मात्र या प्रियकराच्या मनात एक वेगळाच कट शिजत होता. याचे कारण म्हणजे जेव्हा हि मुलगी तिच्या प्रियकराला भेटायची त्यावेळी त्याचे मित्र त्याच्याबरोबर असायचे. या संधीचा फायदा घेऊन प्रियकराच्या मित्राने या तरुणीचे आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करून घेतले. त्यानंतर प्रियकराच्या मित्रांनी या तरुणीला धमकावून आणि ब्लॅकमेल करून तिच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली.

- Advertisement -

मोबाईलमध्ये शूट केलेले व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत प्रियकराच्या मित्रांनी या तरुणीचे लैंगिक शोषण करायला सुरुवात केली. यामध्ये या तरुणीवर एक दोनदा नव्हे तर अनेकदा अत्याचार करण्यात आले आहेत. यामध्ये सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या तरुणीचा प्रियकरच मित्रांच्या मदतीनं तिच्यावर सामुहिकपणे अत्याचार करत होता. जवळजवळ 5 महिने हा सर्व प्रकार सुरू होता. अखेर या पीडीतेने या सगळ्यांना कंटाळून पोलिसांना या अत्याचाराची माहिती दिली. पीडितेने देहूरोड पोलिस ठाण्यात या आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. हा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले आहे. यामध्ये मुख्य आरोपी नोमान उर्फ ​​अरबाज जावेद खानसह, सुलतान उर्फ ​​मुस्ताक सलीम सय्यद, रियाज उर्फ ​​मन्नान जावेद खान, आणि सोहेल पिरजादे यांचा समावेश आहे.