‘मी पुन्हा येईन ! ‘त्या’ 40 आमदारांचा कसा झाला गेम..?; नव्या वेबसिरीजचा Teaser एकदा पहाच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाराष्ट्रात शिंदे – फडणवीसांचे सरकार सत्तेवर आलंय. यामुळे सत्तेतील राजकारण, सत्ता संघर्ष, सत्ता नाट्य हे सगळंच महाराष्ट्रातील जनतेसाठी रोजचं झालंय. राजकारणात चित्रपट, वेबसिरीजमधील विविध डायलॉगची नेहमीच चर्चा असते. कदाचित म्हणूनच का काय.. एक नवीकोरी राजकीय घडामोडींना चिमटा काढणारी वेबसिरीज येतेय. ‘त्या’ ४० आमदारांचं काय झालं..? या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर एक नवी वेबसिरीज प्लॅनेट मराठी ओटीटी घेऊन येत आहे. या वेबसिरीजचे नाव ‘मी पुन्हा येईन’ असे असून याचा टिझर नुकताच प्रदर्शित झालाय.

Mi Punha Yein | A Planet Marathi Original (Official Teaser) | Akshay Bardapurkar | Arvind Jagtap

राजकीय विश्वातील सत्य घटनेवर आधारित अशा अनेक वेबसिरीज गेल्या एकही काळात आल्या आणि गाजल्यासुद्धा. यामध्ये प्लॅनेट मराठीवरील रानबझार चांगलीच चर्चेत असणारी वेब सिरीज आहे. या वेबसीरिजने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला. यानंतर आता भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मी पुन्हा येईन’ या गाजलेल्या डायलॉगचा टायटल म्हणून वापर करत ‘त्या’ चाळीस आमदारांवर झालेला गेम काय होता..? सत्ता नाट्य रंगलं कसं.? हे येऊ घातलेल्या या वेबसिरीजमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे आता वेबसिरीजच्या टिझरनंतर प्रदर्शनाची उत्सुकता आहे.

या वेबसीरिजचे लिखाण व दिग्दर्शन प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांनी केले आहे. तर निर्मिती प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मसह गौतम कोळी आणि जेम क्रिएशन्सने केली आहे. या वेबसीरिजमध्ये अत्यंत प्रभावशाली असे कलाकार आपल्या कलेची प्रतिभा दर्शवतील. यामध्ये अभिनेते सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, भारत गणेशपुरे, सिद्धार्थ जाधव, प्रभाकर मोरे, अमित तडवळकर, रमेश वाणी, संजय कुलकर्णी, राजेश दुर्गे, राजेंद्र गुप्ता, रुचिका जाधव, सीमा कुलकर्णी आणि दिप्ती क्षीरसागर याचा समावेश आहे.

‘मी पुन्हा येईन’ च्या टीझरमध्ये नेमकं काय आहे ?

‘मी पुन्हा येईन’ या वेबसिरीजच्या टीझरमध्ये राजकारणातील अनेक घडामोडींवरील आधारित घटना मसालेदार पद्धतीने दाखवण्यात आल्या आहेत. दोन पक्षाचे नेते सत्तेसाठी आमदारांची कशी पळवापळवी आणि फोडाफोडी करतात…? हे यात दिसत आहे. इतकंच नाही तर शासकीय यंत्रणांचाही कसा वापर केला जातो आणि अधिकारी वर्गही यात आपली पोळी कशी भाजतात हे टीझरमधून पाहता येत आहे. राजकारणावर आधारित या वेबसीरिजमध्ये सत्तेसाठी असणारी लालसा, कपट- कारस्थान, संधीसाधूपणा, आमदारांची फोडाफोडी, पळवापळवी आणि सध्या चर्चेत असलेले ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’ या सर्वांचा झणझणीत तडका आपल्याला पहायला मिळणार आहे.

“मी पुन्हा येईन’चा सध्याच्या राजकीय घडामोडींशी संबंध नाही

मी पुन्हा येईन’ या वेबसीरिजबद्दल प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांनी एक महत्वाची माहिती दिली आहे. त्यांनी म्हंटले आहे की, “सध्याच्या राजकीय घडामोडींचा आणि या सीरीजचा तसा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही, पण जे आपल्या आजुबाजूला घडतं तेच सिनेमात किंवा वेबसीरीजमध्ये तेच पाहायला मिळते. त्यामुळे अगदीच असत्य घटनांवर आधारित ही वेबसीरीज असली तरी राजकीय कुलंगड्या, शह-काटशह हे पाहण्यात प्रेक्षकांना रस असतो हे स्पष्ट आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनाची हीच गरज ‘मी पुन्हा येईन’ ही वेबसीरीज पूर्ण करेल,” असे बर्दापूरकर यांनी म्हंटले आहे.

Leave a Comment