जायकवाडीतील पंप बदलून शहराचा पाणीपुरवठा 20 एमएलडीने वाढवण्याचे नियोजन सुरु

औरंगाबाद : सध्याच्या स्थितीत दोन्ही पाणीपुरवठा योजनेद्वारे शहराला 110 एमएलडी पाणीपुरवराठा होतो.पन नागरिकांना यापेक्षा अधिक पाणी अपेक्षित आहे. यामुळे महानगरपालिका नवीन जलवाहिनी टाकण्याच्या प्रयत्नात उतरली आहे. जलवाहिनी टाकल्यानंतर ही गरज भासू लागेल. मात्र तोपर्यंत 15 ते 20 एमएलडी पाण्याचा पुरवठा वाढवण्याचे नियोजन सुरु आहे.

जायकवाडी येथील पंप बदलून दोन्ही योजनेला क्रॉस कनेक्शन देण्यात येणार आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही योजना कालबाह्य झाल्या आहेत.
त्यामुळे राज्य सरकारने शहरासाठी नवीन राज्य शहरासाठी नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर केली आहे. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून वाटर ऑडिटचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कामाला सुरुवात होईल. अशी माहिती प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दिली. राज्य सरकारने शहरसाठी 1,680 कोटींची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली असून काम सुरु झाले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जीव्हीपीआर यां ठेकेदार कंपनीमार्फत 12 जलकुंभ दोन एमबीआर, एका जलशूद्धिकरण प्रकल्पाचे काम सुरु केले आहे.

जायकवाडी येथील पंप बदलावे लागणार असून त्यामुळे 5 ते 10 एमएलडी पाणी वाढ होईल. त्यापाठोपाठ दोन्ही योजनेला क्रॉस कनेक्शन देऊन पाणी वाढ केली जाईल. तसेच गळत्या बंद करून 20 एमएलडी पाणी वाढण्याची अपेक्षा आहे. असे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी जाहीर केले.

You might also like