PM Kisan : CSC मध्ये e-KYC करण्यासाठी द्यावे लागतात पैसे, फ्रीमध्ये कसे करावे ते पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PM Kisan : शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत रजिस्ट्रेशन केलेल्या शेतकऱ्यांना वर्षभरात सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये जमा केली जाते. या योजनेंतर्गत आतापर्यंत 10 हप्ते शेतकऱ्यांना मिळालेले आहेत.

या योजनेमध्ये रजिस्ट्रेशन केलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आता e-KYC करणे बंधनकारक केले आहे. त्याची शेवटची तारीख 31 मे 2022 आहे. जो शेतकरी हे करणार नाही, त्याला भविष्यात या योजनेचा फायदा मिळणार नाही.

e-KYC 2 प्रकारे करता येईल

शेतकरी PM Kisan साठी e-KYC 2 प्रकारे पूर्ण करू शकतात. e-KYC ची प्रक्रिया घर बसल्याही करता येईल. यासाठी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. तसेच, जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्येही (CSC) e-KYC करता येते. मात्र इथे एक गोष्ट लक्षात घ्या की, जर एखाद्या शेतकऱ्याने स्वत: OTP द्वारे e-KYC केले तर त्याला कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत. मात्र तर जर त्याने कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन e-KYC केले तर त्याला थोडा खर्च करावा लागेल.

PM Kisan eKYC Update, KYC Status Check Online, Last date

फी किती असेल ?

CSC मध्ये बायोमेट्रिक पद्धतीने e-KYC केले जाईल. म्हणजे शेतकऱ्याच्या बोटाचे ठसे घेऊन ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यासोबतच लाभार्थी शेतकऱ्याचे आधारकार्ड आणि रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकाचीही गरज भासेल. CSC वर e-KYC साठी 17 रुपये फी द्यावी लागेल. याशिवाय काही CSC ऑपरेटर 10 रुपये ते 20 रुपये सर्व्हिस चार्ज देखील घेतात. अशा प्रकारे, CSC मध्ये e-KYC करण्यासाठी 37 रुपयांपर्यंत खर्च येऊ शकेल. PM Kisan

अशाप्रकारे ऑनलाइन e-KYC करा

त्यासाठी PM Kisan वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जा.
यानंतर ‘फार्मर्स कॉर्नर’ अंतर्गत e-KYC टॅबवर क्लिक करा.
जे पेज उघडेल त्यावर आधार नंबरची माहिती द्या आणि सर्च टॅबवर क्लिक करा.
यानंतर रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP येईल.
त्यानंतर सबमिट OTP वर क्लिक करा आणि OTP टाकून सबमिट करा.
तुमची e-KYC प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

 

PM KISAN 11th installment: Complete this task by May 31 or else Rs 2,000 may not be disbursed | Personal Finance News | Zee News

हे पण वाचा :

PM Shram Yogi Maandhan : ‘या’ योजनेद्वारे सरकारकडून मिळेल दरमहा 3,000 रुपये पेन्शन

PM Kisan : शेतकऱ्यांना 11वा हप्ता मिळण्यास होतो आहे उशीर, यामागील कारण तपासा

PM Kisan Mandhan Yojana : ‘या’ शेतकऱ्यांना दरमहा मिळेल 3000 रुपयांची पेन्शन, जाणून घ्या तपशील

PM Kisan : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार 2000 रुपये, किती तारखेला येणार 11 वा हप्ता? जाणून घ्या

Leave a Comment