PM Kisan : शेतकऱ्यांसाठी सरकारने पुन्हा सुरू केली ‘ही’ महत्वाची सेवा; असा घ्या लाभ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवित आहे. यापैकीच एक महत्वाची योजना आहे, ‘पीएम किसान सम्मान न‍िध‍ि योजना’. याअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना 6,000 रुपये देते. या योजनेंतर्गत आतापर्यंत 10 हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. सरकार लवकरच 2000 रुपयांचा 11 वा हप्ता जारी करणार आहे. हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले जातात. मात्र यासाठीच्या काही नियमांमध्ये आता बदल केले गेले आहेत. त्याअंतर्गत शेतकऱ्यांना e-KYC करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

यासाठी शेतकऱ्यांना कोणत्याही कॉमन सर्विस सेंटर (CSE) मध्ये जावे लागणार नाही. आता हे काम ते घरबसल्या पूर्ण करू शकतील. काही दिवसांपूर्वी सरकारने आधार ओटीपी द्वारे e-KYC करण्यावर बंदी घालती होती. आता सरकारने हि सुविधा पुन्हा सुरु केली आहे. जर तुम्ही e-KYC केले नसेल तर तुम्हांला पुढील हफ्त्याचे पैसे मिळू शकणार नाहीत. मात्र बॉयोमेट्रिक व्हेरिफिकेशन करण्यासाठी कॉमन सर्विस सेंटर वर जावे लागेल. शेतकऱ्यांना आता e-KYC करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर तुम्हांलाही पुढील हफ्त्याचे पैसे हवे असतील तर e-KYC लवकरात लवकर करावे लागेल.

हे लक्षात घ्या कि, सरकारने e-KYC करण्याची शेवटची तारीख याआधी दोन वेळ वाढविली होती. आता 31 मे पर्यंत e-KYC करावे लागणार आहे. e-KYC करण्यासाठी आधार आपल्या मोबाईल नंबरशी लिंक असणे गरजेचे आहे. जर ते लिंक असतील तर आपण घरबसल्या e-KYC करू शकाल. चला तर मग e-KYC कसे करायचे हे जाणून घेउयात…

सर्वांत आधी तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर PM किसान वेबसाइट http://pmkisan.gov.in उघडा. आता उजव्या बाजूला e-KYC ची लिंक दिसेल.
आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका आणि सर्च बटण दाबा.
तुमच्या मोबाईलवर OTP येईल. ते दिलेल्या बॉक्समध्ये टाईप करावे लागेल.
आधार ऑथेंटिफिकेशनसाठी तुम्हाला पुन्हा बटणावर टॅप करण्यास सांगितले जाईल. त्यावर टॅप करा आणि आधारशी लिंक केलेल्या मोबाइल नंबरवर आणखी 6 अंकी OTP येईल ते भरा आणि सबमिट वर टॅप करा. यानंतर e-KYC पूर्ण होईल अन्यथा Invalid लिहिले जाईल. असे झाल्यास, तुम्ही कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन ते दुरुस्त करू शकाल.

Leave a Comment