PM Kisan: सरकार ट्रांसफर करत आहेत पंतप्रधान किसान योजनेचे पैसे, तुमच्या खात्यात आठवा हप्ता कधी येईल ते तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जर तुम्ही देखील पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM kisan samman nidhi) मध्ये नोंदणी केली असेल तर लवकरच 2000 रुपये तुमच्या खात्यात येतील. हा हप्ता एप्रिल ते जुलै दरम्यान येईल. देशातील सुमारे 11 कोटी 74 लाख शेतकर्‍यांना 8 वा हप्ता (PM Kisan 8th installment) ट्रान्सफर केला जाईल. जर तुम्ही देखील पंतप्रधान किसान सन्मान निधीसाठी अर्ज केला असेल तर पैसे तुमच्या खात्यात येतील की नाही यासाठी यादीमध्ये आपले नाव तपासा.

आपल्या अर्जाचे स्टेट्स तपासून आपण आपला हप्ता मंजूर झाला आहे की नाही हे शोधू शकता. आपल्या पीएम किसान स्टेट्स मध्ये Waiting for approval by state असे लिहिलेले दिसत असेल तर याचा अर्थ असा आहे की, आपल्याला पैसे मिळविण्यात थोडा वेळ लागू शकेल. म्हणजेच राज्य सरकारकडून त्याला अद्याप मान्यता मिळाली नाही.

अशा प्रकारे चेक करा पीएम किसान स्टेट्स

1)प्रथम प्रधानमंत्री किसान योजनेच्या http://pmkisan.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.

2)त्यासोबत ‘beneficiary status’ या पर्यायावर क्लिक करा.

3)त्यानंतर नवीन पेज ओपन होइल.

4) यावर आधार कार्ड क्रमांक, बँक अकाउंट नंबर किंवा मोबाइल यापैकी एक पर्याय निवडा.

5) या तीन क्रमांकाच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात पैसे येतात की नाही हे तुम्ही तपासू शकता.

6) तुम्ही जो पर्याय निवडला आहे त्या ठिकाणी योग्य तो क्रमांक भरा.

7) त्यानंतर ‘Get deta’ या पर्यायावर क्लिक करा.

8) मग तुम्हाला तुमच्या सर्व व्यवहाराची माहिती मिळेल.

9) कुठल्या बँक खात्यात पी एम किसान योजनेच्या हप्त्याचे पैसे जमा झाले आहेत याची देखील माहिती मिळेल.

ऑनलाईन तक्रार करण्यासाठी

जर तुम्हांला ऑनलाईन तक्रार करायची असेल तर PM KISAN help Desk वर ईमेल करून तक्रार देऊ शकता. त्याकरिता ई -मेल आय डी आहे [email protected]. याशिवाय 01123381092 या डायरेक्ट हेल्पलाईन नंबर वर देखील संपर्क करू शकता.

या योजनेचा पहिला हप्ता हा दरवर्षी 1 एप्रिल ते 31 जुलै या कालावधीमध्ये मिळतो दुसरा हप्ता एक ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता एक डिसेंबर ते 31 मार्च या कालावधीत मिळतो मोदी सरकारने 24 फेब्रुवारी 2019 रोजी या योजनेची सुरुवात केली आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment