Wednesday, March 29, 2023

८० कोटी देशवासीयांना नोव्हेंबरपर्यंत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत अन्न- पंतप्रधान मोदी

- Advertisement -

नवी दिल्ली । शेतकऱ्यांसोबत इतरांनाही दिलासा देण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेची घोषणा केली असून याअंतर्गत देशातील ८० कोटींहून अधिक नागरिकांना नोव्हेंबर महिन्यापर्यंत मोफत अन्नधान्य देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. दिवाळीअखेरपर्यंत देशातील कष्टकरी जनतेला आधार देण्यासाठी नरेंद्र मोदींनी ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

अनलॉक २ च्या टप्प्याची सुरुवात झालेली असतानाच पावसाळ्यात होणाऱ्या साथीच्या आजारांपासूनही काळजी घेण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. देशातील कोरोनाग्रस्त मृत्यूंचा दर कमी असल्याचं स्पष्टीकरण नरेंद्र मोदींनी देतानाच गेल्या तीन महिन्यांत या कोरोना परिस्थितीत काय काय बदल झाले यावर भाष्य केलं.

- Advertisement -

सुरुवातीच्या काळात लोकांनी लॉकडाऊनचं गांभीर्याने पालन केलं पण आता त्यामध्ये ढिल पडली असून नागरिकांनी पहिल्याइतकंच गांभीर्य दाखवणं गरजेचं झालं आहे. एका देशाच्या पंतप्रधानाला सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालता गेल्याबद्दल ठोठावल्या गेलेल्या दंडाचं उदाहरणही नरेंद्र मोदींनी यावेळी दिलं. नियम सगळ्यांना सारखे म्हणत त्यांनी नियम मोडणाऱ्यांचे कान पिळले. सरकारने कोरोनाच्या नियंत्रणासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा नरेंद्र मोदींनी यावेळी दिला. यामध्ये गरिबांना धान्य वाटपासोबतच योग्य वेळी केलेला लॉकडाऊन, आरोग्य व्यवस्थेतील सुधारणा यांविषयी मोदी बोलले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”